भाजपा-राष्ट्रवादी आज आमने-सामने

0

धुळे । राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले खुल्या पत्रकार परिषदेचे आव्हान आ.अनिल गोटे यांनी स्विकारले आहे.शुक्रवार दि.8 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता ज्ञानेश्वर भामरे यांच्या केशरानंद हॉल, नगावबारी येथे पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लोकसंग्रामतर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

पत्रकावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुकूंदे लोकसंग्राम युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सुर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे. मुद्रांक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी तेलगीशी मैत्री, तेलगीने नार्को व ब्रेन मॅपींग टेस्टमध्ये व छगन भुजबळ यांचा केलेला नामोल्लेख, मांगले व मोपलवार यांच्याशी संबंध, शहरातील गुड्ड्या हत्याकांड व त्यासंबंधातील भूमिका या तीन विषयांवर समोरासमोर चर्चा व्हावी, असेही पत्रकात म्हटले आहे.

                                        

तर राष्ट्रवादीनेही समोरासमोर पत्रकार परिषद घेण्याची तयारी दाखविली आहे. यावेळी देवकाते, जाधव, खेडकर खूनप्रकरण, म.न.पा जळीतकांड, जिल्हा बँक जळीत कांड, गुड्या हत्याकांड आदी प्रकरणी आपण पुराव्यासह यावे.

तसेच मांगले प्रकरणात पुराव्यासह केलेल्या आरोपाचे पुराव्यासह स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा त्याचठिकाणी प्रायश्चित्त घेण्याची तयारी ठेवावी,असे राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी म्हटले आहे.

दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना खुले आव्हान दिलेले असल्याने 8 डिसेंबरला दोघे गट आमनेसामने येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजपात पत्रकयुध्द सुरू आहे.

एकमेकांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत समोरसमोर चर्चा व्हावी म्हणून दोन्ही गटांतर्फे आव्हान देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*