मुख्यमंत्री आज शिंदखेड्यात

0

शिंदखेडा । शिंदखेडा नगरपंचायत निवडणुक प्रचारासाठी उद्या दि.8 डिसेंबर 2017 रोजी दुपारी अडीच वाजता येथे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपातर्फे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे, राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा होणार आहे.

शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी भाजपाने सर्वच्या सर्व 17 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी सौ.रजनी अनिल वानखेडे या निवडणुक लढवित आहेत.

या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या दि.8 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री यांची जाहीर सभा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होत आहे.

या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गटप्रमुख अनिल वानखेडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*