अक्कलपाड्याचे पाणी सांजोरी तलावात !

0

धुळे । अक्कलपाडा उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने सांजोरीसह गोताणे, उडाणे, कुंडाणे ये़थील तलाव भरले गेले. त्याचा फायदा या तलाव क्षेत्रात येणार्‍या शेतीला आणि विहीरींना होणार आहे.

यामुळे शेतकर्‍यांच्यां सिंचन क्षेत्रात वाढ झाली असल्याचे प्रतिपादन आ. कुणाल पाटील यांनी जलपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.धुळे तालुक्यातील सांजोरी येथील तलाव अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने भरण्यात आला.

या तलावातील पाण्याचे जलपूजन आ.पाटील यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ. पाटील पुढे म्हणाले की, अक्कलपाडा प्रकल्प हा रोहिदास पाटील यांनी शेतकर्‍याला केंद्रबिंदू ठेवून निर्माण केला आहे.

प्रकल्प निर्मितीच्या अंतिम आराखडा तयार करतांनाच डावा कालवा, उजवा कालवा आणि पांझरेत पाणी सोडून त्या क्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी देण्याचे नियोजन केलेले होते आणि आज त्याच्या नियोजनातून हे पाणी दिले जात आहे.

डावा आणि उजवा कालव्यातून त्या-त्या शिवारातील लहान मोठे तलावही भरण्याचे त्याचवेळी नियोजित होते. त्यामुळे हे तलाव आज भरले जात आहे

. उजव्या कालव्यातून पाणी सोडून सांजोरीसह गोताणे, उडाणे, आणि कुंडाणे येथील धरणे भरण्यात आली. यामुळे जमीनीतील व विहीरीतील पाण्याची पातळी वाढून पुढील पिक घेण्यास शेतकर्‍यांना उपयोगी ठरणार आहे.तर सांजोरी, कुंडाणे, उडाणे या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल, अशी माहिती यावेळी आ. पाटील यांनी बोलतांना दिली.

कार्यक्रमाला आ.पाटील यांच्यासमवेत समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, पं.स. माजी सभापती बाजीराव पाटील, दुध संघाचे चेअरमन वसंत पाटील, सांजोरीचे उपसरपंच गणेश लंगोटे, विद्यावर्धिनीचे संचालक अशोक सुडके, खरेदी विक्रीचे संचालक बापू खैरनार, पं.स.सदस्य प्रमोद भदाणे, युवक काँग्रेस अध्यक्ष हर्षल साळुंके, प्रभाकर भिल, दिलीप पाटील, शंकर गवळी, सुभाष घुगे, भूषण घुगे, गुलाब माळी, दशरथ पाटील, ज्ञानेश्वर भिल, यांच्यासह सांजोरी, कुंडाणे येथील ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उपसरपंच गणेश लंगोटे आणि सांजोरी येथील पदाधिकार्‍यांनी केले होते.

LEAVE A REPLY

*