आर्वी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार !

0

आर्वी । आर्वीसह परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याची चर्चा आहे. नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाने मुक्तसंचार करण्यार्‍या बिबट्याचा शोध घेवून बंदोबस्त करावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत माहीती अशी की, महिन्याभरापूर्वी पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला. अनकवाडी शिवारातील टेंभे नाल्याजवळदेखील बिबट्याचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर शिरूड, बोरकुंड, मोघन शिवारात देखील बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे बोलले जात आहे. त्या परिसरात ऊस,डाळिंब असल्यामुळे लपण्यासाठी जागा आहे.

आर्वी परिसरामध्ये अनेक शेतकरी, शेतमजूरांना बिबट्या व पिलासह जोडीने मुक्त संचार करीत असल्याचे बोलले जात आहे. तसेच रात्रीच्या वेळेस कुत्रे, शेळी, मेंढ्या फस्त केल्याची चर्चा आहे. याबाबत वनविभागाने बघ्याची भूमिका घेतली आहे.

शेतकरी, शेतमजूर शेतीकामासाठी जाण्यास देखील घाबरत आहे. वीज वितरण कंपनीकडून दिवसाचे भारनियम असल्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री-बेरात्री शेतात जात असतांना अशावेळी बिबट्याची भिती मनात असतेे.

सध्या परिसरामध्ये खरीब रब्बी हंगामाची कामे सुरू आहेत. कापूस वेचणी, सोयाबिन, मका, ज्वारी, बाजरी, कडधान्य यांची काढण्याची कामे सुरू आहेत.

बहूतेक शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतात थांबून असतात अनेकाच्या शेती, गाय, म्हशी, शेळी,मेढी पालन शेतात आहे. म्हणून बिबट्या रात्रीच्या वेळेस केव्हा येईल यांची भिती मनात असते.

रात्रभर जागरण होत आहे. बिबट्या रात्रीच्या वेळेस मुक्त संचार करीत असल्याचे वृत खरे की खोटे याबाबत वनविभागाने चौकशी करावी, काही महिन्यांपूर्वी लळींग घाटात बिबट्याचा अपघात मूत्यृ झाला होता.

याबाबत सगळेजण साक्षी आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने रात्रीच्या वेळी गस्ती घालावी, अन्यथा बिबट्याची शोधमोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

*