जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज घंटानाद

0
धुळे / दि.1 जूनपासून शेतकरी संपावर गेल्याने दुध, भाजीपाला व कांदासकट अन्नधान्याची नासाडी होत आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकर्‍यांनी संपाचे हत्यार उचलले आहे.
या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी उद्या शिवसेना व विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीवर घंटानाद व निदर्शने सकाळी 11 वाजता आयोजित केले असून या आंदोलनात विविध पक्ष,संघटना व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी केले आहे.

राज्यात 1 जूनपासून शेतकरी संपावर गेले आहेत. 1 जून ते 7 जून या दरम्यान शेतकरी आपला माल कोठेही विकणार नाहीत. शेतकर्‍यांनी मुंबई, पुणे मोठ्या शहरांना होणारा दूध, भाजीपाल्याचा पुरवठा बंद केला आहे.

शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्नांवर सरकारने तोडगा काढून कर्ज माफ केले पाहिजे. दूध व भाजीपाल्यांचे दर वाढले पाहिजेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजेत, अशा मागण्यांसाठी शेतकरी पेटून उठला आहे.

शिवसेना पक्षाच्या राज्यभर कर्जमुक्तीचे फॉर्म भरले जात असून स्वामीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई पदयात्रा करुन आत्मक्लेश आंदोलन केले आहे.

 

LEAVE A REPLY

*