नंदुरबार व तळोद्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा

0

नंदुरबार । नगरपालिका निवडणूकांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या दि. 8 रोजी नंदुरबार, तळोदा येथे जाहीर सभा होणार आहेत.

मुख्यमंत्री ना.फडणवीस हे उद्या दि. 8 रोजी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सारंगखेडा येथे चेतक फेस्टीव्हल अंतर्गत जागतिक अश्वसंग्रहालयाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे.

त्यांचा दौरा असा- सकाळी 11 वाजता कळंबू येथे आगमन, 11.30 वाजता सारंगखेडा येथे मोटारीने प्रयाण, 11.30 ते 1.25 चेतक फेस्टीव्हलच्या कार्यक्रमांना हजेरी. 1.40 वाजता तळोद्याकडे प्रयाण, 1.50 ला तळोदा येथील मिल कंपाऊंड येथे आयोजित नगरपालिका जाहीरसभेला उपस्थिती, 3 वाजता शिंदखेडयाकडे प्रयाण, 3.30 ला नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचारसभेला उपस्थिती, 4.30 ला नंदुरबारकडे प्रयाण, 5 वाजता नंदुरबातील दीनदयाल चौकातील जाहीरसभेला उपस्थिती, 5.50 ला नाशिककडे प्रयाण, असे जिहा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

यावेळी ना.फडणवीस यांच्यासोबत पर्यटन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*