पक्षाविरुद्ध विरोधकांना मदत करणारे असंतुष्ट कोण ?

0

धुळे । सतीष मांगलेप्रकरणी माझी चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मी स्वत:च मागणी करणार असल्याचे आ.अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले होते.

त्यानुसार त्यांनी तशा आशयाची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीले आहे. विरोधकांना मदत करण्याचे काम व पक्षाविरुध्द भूमिका घेण्यासाठी कोण प्रोत्साहन देतो, याचाही खुलासा व्हावा, असे आ. गोटे यांनी पत्रात म्हटले आहे.

पत्रात आ. गोटे यांनी पत्रात म्हटले आहे की, सद्य:स्थितीत कुठलीतरी प्रकरणे उकरुन काढून, भाजपावर टिका करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची कामाची पध्दत ठरली आहे. दुर्दैवाने पक्षातील असंतुष्ट मंडळी यांना प्रोत्साहन देत आहेत.

मोपलवार प्रकरणाकडे आपले ध्यान आकर्षित केल्यावर ही एवढी माहिती मिळाली कशी? असा प्रश्न आपण केला होता. त्यावेळी मी दिलेली माहिती व घटनाक्रम आपण जाणून आहातच.

सद्य:स्थितीत विरोधकांना रसद पुरवायची पध्दत वेगाने वाढते आहे. वस्तूत: कोण सतीश मांगले? धुळ्याच्या दैनंदिन राजकारणाशी याचा काय संबंध? मोपलवार याचा काय संबंध? याचा काहीही विचार न करता अनिल गोटेंची टेस्ट करा, वगैरे प्रकार सुरु आहेत.

त्यामुळे सर्वप्रथम माझी, नंतर राधेशाम मोपलवार, सतीश मांगले आदींसह गुड्ड्या प्रकरणात मोक्का कायद्याखाली अटक केलेल्या संशयितांची ब्रेन मॅपिंग, नार्को व लाय डिटेक्टर चाचणी करावी. विरोधकांना मदत करण्याचे काम व पक्षाविरुध्द भूमिका घेण्यासाठी कोण प्रोत्साहन देतो, या सर्वांचा झालेला खुलासा शासन चालविण्यासाठी मार्गदर्शक ठरु शकेल.

आपण खंबीरपणे शासन चालवित असताना असंख्य अडचणींवर मात करुन दमदार पाऊल टाकत आहात. असे असताना आपल्या निर्णय क्षमतेवर शंका घेणे हे पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या सहनशिलते पलिकडील आहे.

विरोधी पक्षाकडून केलेल्या मागणीची पूर्तता आपण करीत नाही, अशी टिका आपल्यावर होवू नये. या प्रामाणिक भावनेने या विषयासंबंधी आवश्यक त्या सूचना व आदेश पारित व्हावेत, असेही आ. गोटे यांनी पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*