गुड्ड्याच्या खुनात ‘व्हाईट कॉलर’ पुढारी कोण ?

0

धुळे । गुलमोहर रेस्ट हाऊसमध्ये कोणकोणत्या पोलीस अधिकार्‍याला बोलावून गुड्या खुनात कोणाच्या नावासाठी आग्रह धरला, ते कबुल करावे. निरपराध लोकांना राजकीय दबावातून अडकवणार नाही, असे तोंडावर सुनावणारा पोलीस अधिकारी कोण? गुड्याच्या खुनात खरा व्हाईट कॉलर छपरी पुढारी कोण? मारेकर्‍यांना एका बागेत पार्टी देणारा छपरी पुढार्‍याचा मुलगा कोण? समोरासमोर पत्रकार परिषद घेऊन या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आव्हान राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी आ.अनिल गोटे यांना दिले आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. मोरे यांनी म्हटले आहे की, तुमच्याच घरासमोर धुळेकर नागरिकांच्या, माय माऊल्यांच्या साक्षीने पत्रकार परिषद घेवू या. तुमचे ओपन चॅलेंज स्वीकारले आहे.

तुम्ही उपस्थित केलेल्या कथित प्रश्नांच्या पुराव्यासह पत्रकार परिषदेत यावे. यातला एक जरी प्रश्न पुराव्यानिशी सिद्ध केलास तरी ते भोगायला आम्ही तयार आहोत.

आम्ही तुमच्याविरोधात केलेले आरोप सर्व पुराव्यानिशी घेऊन आलो आणि पुरावे देऊ शकलो नाहीतर बसलेल्या माय माऊल्या, धुळेकर जनता सांगेल ते प्रायश्चित जागेवर घ्यायला आमची तयारी आहे.

आम्ही केलेल्या आरोपांबाबत तक्रार करणार असून, मांगलेसोबत तुम्हाला आरोपी करून मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी म्हणून मागणी करणार आहोत.

परंतू यासंदर्भात तुम्ही पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल मुख्य न्यायाधीश किंवा पोलीस प्रशासन, सीबीआयकडे चौकशीची मागणी केल्याबाबतच्या पत्राची कॉपी द्यावी.

श्रद्धा मांगले, सतीष मांगले या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी आपण लेखी पत्र दिल्याचे पुरावे आम्ही पत्रकार परिषद घेऊन दिलेत. कैलास गौडा नामक व्यापार्‍यासमवेत आपले झालेले संभाषण आम्ही ऐकविले.

आम्ही केलेल्या आरोपांवर बोलावे, विषय बदलवून जनतेचे लक्ष विचलित करू नये, असेही मनोज मोरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*