बा, भिमराया तुझ्यामुळे उद्धारली कोटी – कोटी कुळे !

0

धुळे ।

श्रीसोनगीर बागुल हायस्कुल
येथील एन. जी. बागूल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देण्यात येऊन विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक तथा प्रभारी प्राचार्य बी.एच.माळी होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुनील बागूल, प्रभारी उपमुख्याध्यापक के.एन.पाटील, माजी उपसरपंच प्रकाश गुजर, व्ही.के.पाटील, आर.एच.गुजर, एम.आर.रोकडे, एल.बी.चौधरी, आर.पी.चौधरी,के.व्ही.पोतदार उपस्थित होते. शिक्षकांपैकी सुनिता चौधरी, के.बी.दुसाने, विद्यार्थ्यांपैकी दिव्या धनगर, अक्षय पाटील, संदीप बडगुजर यांनी बाबासाहेबांची शिकवण यावर माहिती दिली. सुत्रसंचलन यु.आर.भदाणे यांनी केले.

दोंडाईचा भाजपा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोंडाईचा शहर भाजपाकडुन अभिवादन करण्यात आले.

दोंडाईचा येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दोंडाईचा भाजपा शहराध्यक्ष संजय तावडे, दोंडाईचा नगरपालिकेचे आरोग्य सभापती प्रवीण महाजन, बांधकाम सभापती संजय मराठे, शिक्षण सभापती भरतरी ठाकूर, महिला बालकल्याण सभापती खलील बागवान, नगरसेवक जितेंद्र गिरासे,नगरसेवक कृष्णा नगराळे, भारिप बहुजन महासंघाचे रमेश कापुरे, न.पा.कामगार युनियन चे अध्यक्ष रघुनाथ बैसाणे,भाजपा सरचिटणीस प्रमोद चौधरी, ईश्वर धनगर, पंकज चौधरी, भाजपा युवा मोर्चा दोंडाईचा शहराध्यक्ष पंकज बोरसे, सचिन नगराळे, रवि अहीरे, गोविंदा नगराळे, शिवा नगराळे, दिपक बाविस्कर, दादाभाई कापुरे, अनिल सिसोदिया, मनोज निकम, योगेश ठाकूर, पप्पू धनगर, संदीप धनगर, प्रफुल्ल नगराळे, सागर नगराळे, अजय बिराडे, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य सभापती प्रविण महाजन यांनी मनोगत व्यक्त करुन महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन उपस्थित आंबेडकरी जनतेस मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि अहिरे यांनी केले.

साक्रीत अभिवादन
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील बौद्ध समाज बांधवांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत बस स्थानक परिसरात आज सकाळी 10 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश सोनवणे व तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक आर एस पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ विवेक जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शहरातील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना करण्यात आली. याचबरोबर समाज बांधावांतर्फे येथील कन्या छात्रालयातील विद्यार्थ्यांना पेन व वही वाटप करण्यात आले

LEAVE A REPLY

*