उड्डाणपुलासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे उपोषण

0

कापडणे । देवभाने फाट्यावर उड्डाण पुलासाठी आज (दि.6) कापडणेसह येथील व परीसरातील ग्रामस्थांनी पायी चालत जावूुन अभिनव आंदोलन केले. यानंतर देवभाने फाट्यावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या लक्षवेधी आंदोलनाने तरी जाग येईल का? असा सवाल यावेळी उपस्थित होत होता. या आंदोलनात कापडणे परीसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी व पत्रकार संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कापडणे- देवभाने या फाट्यावरुन परीसरातील 10-12 गावातील शेकडो प्रवाशी प्रवास करतात. जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतांना मोठी जोखीम पत्करावी लागते.

पादचारी, दुचाकीस्वार वा चारचाकीस्वार यांचे छोटेमोठे अपघात नेहमीच होतात. यात येथे केवळ उड्डाणपुल नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले असुन काही ग्रामस्थांना अपंगत्वही आले आहे.

धुळे- पळासनेर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असतांना कापडणे- देवभाने फाट्यावर उड्डाणपुल आवश्यक असतांना विकसक कंपनीने वेळ मारुन नेली.

दरम्यान येथील ग्रामस्थ व पत्रकार संघाने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचे ठरविले आहे. यातच आज(दि.6) कापडण्यापासुन पायी जात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा किसान मोर्चा आघाडीचे उपाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील, कापडणे सरपंच भटु पाटील, धनुरचे गटनेते सुनील शिंदे, उपसरपंच विजय चौधरी, अरविंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत पाटील, जगदीश पाटील, भटु पाटील, कौठळ सरपंच बुधा भील, प्रमोद पाटील, तानाजी पाटील, शाम पाटील, महेश माळी, मनोज पाटील, शैलेश चौधरी, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर माळी, पांडुरंग पाटील, प्रवीण पाटील, शरद टेलर, विजय माळी सह ग्रामीण पत्रकार संघाचे जगन्नाथ पाटील, रामकृष्ण पाटील, जिजाबराव माळी, विठोबा माळी आदींसह कापडणे, धनुर, लोणकुटे, न्याहळोद, तामसवाडी, हेंकळवाडी, कौठळ, देवभाने येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बापु खलाणे यांनी याबाबत सुरु असलेल्या पाठपुरावाचा लेखाजोखा मांडला. जिजाबराव माळी यांनी 2011 पासुन या आंदोलनाची पार्श्वभूमी विषद केली. तर जगन्नाथ पाटील यांनी भावी आंदोलनाची दिशा मांडली.

रामकृष्ण पाटील यांनी यातील कायदेशिर बाजुंवर प्रकाशझोत टाकला. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष नवल पाटील, सरपंच भटु पाटील, धनुर गटनेते सुनिल शिंदे, सदस्य प्रविण पाटील, विठोबा माळी आदींनी मनोगत व्यक्त केले.

या मागणीसाठी विविध आंदोलने उभारली जाणार आहेत. याबाबत तात्काळ निर्णय घेत उड्डाणपुल मंजुरीसाठी सर्वपक्षीय प्रयत्न व्हावेत अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*