वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा !

0

धुळे । वृत्तपत्रविक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासह विविध मागण्यांसाठी वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष विकास सूर्यवंशी, उपाध्यक्ष चंद्रकांत जैन, सचिव महेबूब पठाण, कार्याध्यक्ष शिरीष जैन, वसंत वाणी, विनोद चिंचोरे, बी. झेड. पाटील, वसंत वाणी, राजू शिरोळे, वसंत चौधरी, सुरेश सोंजे, आर.एन. जोशी आदी उपस्थित होते.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने 29 जुलैला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निवेदन दिले होते.

परंतु अद्याप याविषयी निर्णय झालेला नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांना गटई कामगारांप्रमाणे स्टॉल लावण्यासाठी जागा द्यावी, वृत्तपत्र विक्रेत्यांना परवाना द्यावा, शासकीय घरकुल योजनेत विक्रेत्यांसाठी घरे राखीव ठेवावी, बस प्रवासासाठी संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांना मोफत पास मिळावा, शासकीय विश्रामगृह बैठकीसाठी सवलतीच्या दरात मिळावे, विधान परिषदेवर असंघटित कामगारांचा प्रतिनिधी घेण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

*