आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने पांझण डावा कालवा दुरुस्तीला प्रारंभ

0

धुळे । तालुक्यातील तरवाडे शिवारातील गिरणा पांझण डावा कालव्याच्या उपचारींचे आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने दुरूस्ती करण्यात येत असून या कामाचा आ.पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

या कामामुळे सुमारे 250 हेक्टर शेतीला फायदा होणार आहे. तर 235 विहींरीचा जलस्तर उंचावण्यास मदत होईल.

गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडून शिरुड-मोरदड-तरवाडे परिसरातील शेतीला पाणी देणे गरजेजे होते.यासाठी येथील शेतकर्‍यांनी पाणी सोडावे म्हणून आ.कुणाल पाटील यांच्याकडे मागणी केली होती.

तत्पूर्वी सदर चार्‍या दुरूस्त करणेही आवश्यक असल्याने आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने पोटचारी क्र 9 अ पासून दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आला.यावेळी आ.पाटील यांच्यासमवेत खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, सरपंच अनिल पवार, शाखा अधिकारी निलेश पाटील, राजेंद्र पाटील, विनायक पाटील, अरूण पाटील, रतन राठोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शिरुड भागात एकूण 25 ते 30 कि.मी. पाटचार्‍यांचा विस्तार असून प्रारंभी 8 कि.मी.च्या चारीस दुरूस्तीला सुरूवात करण्यात आली आहे.

याकामामुळे तरवाडेसह शिरुड परिसरातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यास मदत होणार आहे. दरम्यान आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने गिरणा डावा कालव्याचे दोन आर्वतनेही सोडण्यात येणार आहे.

त्यातून सुमरे 250 हेक्टर शेतीला फायदा होवून शिवारातील 235 विहीरींचा जलस्तर वाढून पाणी टंचाई दूर करण्यास मदत होणार असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी कार्यक्रमात बोलतांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

*