‘ओखी’चा तडाखा : धुळ्याला पावसाने झोडपले

0

देशदूत चमूकडून,धुळे । जिल्ह्यात आज बेमोसमी पावसाने धुमाकुळ घातला असून यात शेतकर्‍यांचे रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.काल सकाळपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्यामुळे शिंदखेडा, साक्री, शिरपूर, दोंडाईचा, पिंपळनेरसह जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला होता.

बोराडी परिसरात चर्‍याची मोठी नुकसान – बोराडीसह परिसरात दुपारी बारा वाजेपासून पावसाच्या हलक्या स्वरूपात सततधार सुरू आहे. तसेच दुपारी तिन वाजेनंतर पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासुन वातावरणात बदल झाला होता.

या बेमोसमी पावसामुळे शेतकर्‍यांच्या चिंतग्रस्त झाला आहे सध्या कापास ,बाजरी,ज्वारी पिकाची काढणी सुरु असुन त्यामुळे शेतकरी चिताग्रस्त दिसुन येत आहे.जनावराच्या चर्‍याची मोठी नुकासान होण्याची नाकरता येत नाही.

पावसाने सकाळपासुन रिमझिम सुरु असल्याने कापास काढणीसाठी शेतकर्‍याचे धावपाळ सुरु आहे.काही शेतकर्‍याचे कापूस काढली नसल्याने चितेत झाला आहे.

तसेच अवकाळी पावसामुळे मठ तूर हे शेतातच सोडून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे तसेच गहू, हरभरा पेयारणी लांबणीवर पळाले आहे.

लामकानी येथे मुसळधार पाऊस- लामकानी परिसरात आज सकाळी पावसाचे वातावर होते. व 12 वाजेपासुन तर संध्याकाळ पर्यत रिमझिम पावसाच्या सरी चालु होत्या.

शेतकर्‍याच्या पिकुन आलेल्या मालाचे मोठया प्रमाणावर नुकसाण झाले. कांदा, कपाशी, भुईमुग शेगा, दादर,मका, तुर, मठ,आदि पिकाचे नुकसाण झाले आहे.

आणि नुक्ताच आता कांदा लागवड करीत आहे. शेतकरी हा चितेत झाला आहे. मठ झाकतांना शेतकरी प्रकाश पाटील लामकानी.

सामोडे येथे शेती पिकांचे नुकसान- साक्री तालुक्यातील सामोडे येथे झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून या पावसाची सुरुवात आज सकाळी झाली होती.

अचानक पावसाची सुरुवात झाल्यामुळे शेतकर्‍यांनी उघड्यावर टाकलेला मका, कांदा आदी पिके पावसात सापडल्यामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली होती.

दिवसभर साक्री पश्चिम पट्ट्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात येणार्‍या काळात गुरांच्या चार्‍याची टंचाई भासू शकते.

तर्‍हाडी परिसरात शेतकर्‍यांची धावपळ- शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडीसह परिसरात आज तुरळक पावसानी दिवसभर हजेरी लावली होती. यात शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली असून या बेमोसमी पावसामुळे कांदा, दादर, मका, मठ, कपाशी, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले आहे. हा पाऊस वरुळ, भटाणे, मालपूर, विखरण लोंढरे, जवखेडा, अभयनपूर या परिसरात झाला.

LEAVE A REPLY

*