बारीपाड्याच्या परिवर्तनाची कहाणी देशभरात जाण्याची गरज ! – सरसंघचालक

0

देवाजी राऊत,वार्सा । संपूर्ण जग एका नव्या दिशेच्या शोधात आहे. एकी, विश्वास आणि मेहनतीच्या बळावर परिवर्तन घडवून बारीपाडा गावाने विकासाची ही नवी दिशा निश्चित केली आहे.

या गावाचा आदर्श घेऊन अन्य गावांनी त्यादिशेने विकास करण्याची आवश्यकता आहे. या गावाच्या परिवर्तनाची कहाणी देशभर जाण्याची गरज आहे, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी बारीपाडा गावाचा गौरव केला.

जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बारीपाडा या आदिवासी गावाने जल, जमीन, जंगल, जन आणि जानवर या ग्रामविकासातील पंचसूत्रीचा आधार घेऊन गेल्या 26 वर्षांत स्वावलंबी ग्राम निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

सरसंघचालकांनी या गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.त्यावेळी डॉ. मोहन भागवत बोलत होते.
बारीपाड्यातील ग्रामस्थांनी परिश्रमाच्या बळावर गावाचे परिवर्तन घडवून आणल्याचे ऐकले होते, पण आज प्रत्यक्षात बारीपाड्याचे दर्शन घतले.

विविध प्रयोगांची प्रत्यक्ष माहिती घेता आली, याबद्दल संरसंघचालकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामस्थाशी संवाद साधताना सरसंघचालक म्हणाले की, माणूस आणि माणूसपण टिकून राहिले तर गाव चांगले घडते, हे बारपाडाने सिध्द केले आहे.

चांगुलपणाची ही परंपरा पुढे नेण्यासाठी अशी गावे पुढे नेण्याची गरज आहे. आज लोक नव्या दिशेच्या शोधात आहे. ही दिशा बारीपाड्याने दाखविलली असल्याचे गौरवोद्गार डॉ.भागवत यांनी यावेळी काढले.

बारीपाड्यातील ग्रामस्थांनी घडवून आणलेल्या परिवर्तनाची कहाणी सार्‍या देशभरात जाण्याची आवश्यकता आहे.हे परिवर्तन स्वतः अनुभवले असल्याने बारीपाड्याच्या प्रयोगाबाबत मी प्रत्येक ठिकाणी माहिती देत राहील, असेही सरसंघचालकांनी दिले.

हितचिंतकांची बैठक
याप्रसंगी डॉ.मनीष सूर्यवंशी, लहानू चौधरी, विजय पवार व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. आनंद फाटक यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन अभिमान पवार यांनी केले.

अनेक यावेळी आपले विचार मांडले. बारीपाडातील ग्रामस्थांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बारीपाड्याच्या हितचिंतकांची यावेळी सरसंघचालकांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

यावेळी व्यासपीठावर चैतराम पवार, बापू चौधरी, डॉ.मंदार म्हसकर उपस्थित होते. चैतराम पवार यांनी बारीपाडा गावाबाबत सविस्तर निवेदन केले. सुत्रसंचालन दिलीप पवार यांनी केले.

वनवासी नृत्याने स्वागत
सकाळी दहा वाजता डॉ.मोहन भागवत यांचे बारीपाडा गावात आगमन झाले. पारंपारिक वनवासी नृत्य वाद्यांच्या साथीने सरसंघचालकांना ग्रामदर्शन घडविण्यात आले.

बारीपाडाचे सरपंच अनिल पवार यांच्या निवासस्थानी गावातील भगिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. बारीपाड्याच्या ग्रामस्थांनी गेल्या 26 वर्षांत राखलेले 1100 एकर जंगल हे तेथील एक वैशिष्टय बनले आहे.

या जंगलाला सरसंघचालकांनी भेट दिली. या जंगलातील विविध वृक्षांच्या प्रजाती, औषधी वनस्पती, वनभाज्या याबरोबरच ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधलेले दगडी बंधारे, मातीचे बांध यांचीदेखील सविस्तर माहिती सरसंघचालकांनी ग्रामस्थांकडून घेतली.

उजाड माळरानावर ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या जंगलचे विहंगम दृश्य बघितल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्यमंत्री जयकुमार रावल, खा. हिना गावित यांची यावेळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*