शाळा महाविद्यालयात पालकांची पिळवणूक मनवि सेनेतर्फे निवेदन

0

धुळे । सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पालकांची पिळवणूक करणार्‍या शाळा, महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

दरवर्षी महाविद्यालयांकडून डिसेंबर अखेर व जानेवारीच्या प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक शाळा, महाविद्यालयांतर्फे स्पर्धेच्या युगामध्ये वेगळेपणा दाखविण्यासाठी मोठे कार्यक्रम तसेच विविध डेचे आयोजन केले जाते. यासाठी लागणारा खर्च हा विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून आकारला जातो.

त्यामुळे पालकांनी पिळवणूक होवून त्यांना आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. शाळा, महाविद्यालये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाचा भार विद्यार्थी व पालकांवर टाकतात.

त्याच्या शुल्क आकारणीची कोणतीही पावती विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही. शैक्षणिक संस्थांना शासनाने ठरवून दिलेल्या रकमांपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारता येत नाही व त्या अतिरिक्त रकमा स्विकारत असतील त्याबाबतच्या पावत्या देखील विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक असूनही पावत्या विद्यार्थ्यांना दिल्या जात नाही.

त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली व आयोजनाचे निमित्त करुन विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क गोळा करुन विद्यार्थी व पालकांची आर्थिक लुट करण्यात येत आहे.

शाळा व महाविद्यालयांकडून आकारले जात असेल त्यांनी अतिरिक्त शुल्क आकारु नये. अशी मागणी प्रसाद देशमुख, यश शर्मा, राहूल मराठे, नितीन शर्मा, विजू जगताप, रवी शिंदे, कमलेश जडे, अभिजीत सोनवणे, हर्षल परदेशी, गणेश जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*