मका खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवा -आ.पाटील

0

धुळे । शेतकर्‍याने आपल्या शेतीत उत्पादीत केलेला मका विक्रीसाठी आणला तर हेक्टरी 24 क्विंटल हे प्रमाण मानून त्यांच्याकडील 7/12 उतार्‍यावरील जमीनीच्या श्रेयानुसार उर्वरित मका खरेदी केला जात नाही.

बोरविहीर येथील खरेदी केंद्रावरून न केलेला मका पुन्हा घरी घेऊन जावा लागत असल्याने वाहतूक खर्च वाढत आहे. तरी प्रति हेक्टरी घातलेली 24 क्विंटल उत्पादनाची मर्यादा वाढवून ती सरसकट 50 क्विंटल करण्यात यावी व यासंबधीचा अहवाल तातडीने शासनाला सादर करावा, अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

आ.कुणाल पाटील यांच्यास खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, माजी चेअरमन विजय पाटील, पं.स.चे उपसभापती दिनेश भदाणे, माजी सभापती बाजीराव पाटील, संचालक बापू खरैनार, बुरझड सरपंच एन.डी.पाटील, खरेदी विक्री संचालक संतोष राजपूत, पं.स.सदस्य प्रभाकर गवळे, प्रमोद भदाणे, पंढरीनाथ पाटील, मोराणे सरपंच प्रविण सोनवणे, युवक काँग्रेस अध्यक्ष हर्षल साळुंके, प्रताप पाटील, संदिप पाटील, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

मका खरेदीसाठी एजन्सी म्हणून धुळे तालुका खरेदी विक्री सहकारी संघ लि. या संस्थेची नियुक्ती केली असून बोरविहीर येथे वैभव पशूखाद्य गोडाऊन येथे सूूरू आहे.

याठिकाणी तालुका पुरवठा विभागाचे प्रतिनिधी म्हणून मगन रामोळे यांची नियुक्ती केली असून त्यांनी मनमानी कारभार चालविला आहे.

मनात येईल तेव्हा खरेदी केंद्र बंद ठेवणे, रोज संध्याकाळी खरेदी केलेला माल ताब्यात न घेणे अशा प्रकारचा त्यांचा कारभार सुरू असून या अधिकार्‍यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.

LEAVE A REPLY

*