हस्ती करंडक फ्लोअर बॉल स्पर्धेचा बक्षीस

0

दोंडाईचा । हस्ती बहुउद्देशिय सांस्कृतिक भवन-दोंडाईचा येथे हस्ती करंडक 4 थ्या वरिष्ठ गट महिला व पुरुष – राज्यस्तरीय फ्लोअर बॉल अजिंक्यपद स्पर्धेचे बक्षिस वितरण व समारोप सोहळा उत्साहात झाला.

स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य फ्लोअर बॉल असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्यु.कॉलेज-दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य फ्लोअर बॉल असोसिएशन सचिव रविंद्र चोथवे, स्पर्धा आयोजककैलास जैन, व हस्ती स्कूल संचालक डॉ.विजयनाम जोशी, तसेच प्रशासकिय अधिकारी हरिकृष्णनिगम हे मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते फ्लोअर बॉलच्या विजयी संघाना पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. विजयी संघ-मुले परभणी प्रथम, जळगांव द्वितीय व पुणे-तृतीय क्रमांक आणि मुली-जळगांव-प्रथम, नंदुरबार-द्वितीय व नागपूर-तृतीय. यांचासमावेश आहे.

यावेळी मान्यवरांनी आपली मगोगत व्यक्त केले. रविंद्र चोथवे यांनी मार्गदर्शन प्रतिपादन केले. कैलास जैन यांनी महान खेळाडू बनण्यासाठी क्रीडा कौशल्यासोबत अंगी विनम्रता असणे ही महत्त्वाचे आहे, असे सांगीतले.

स्पर्धेचे पंच देवेंद्र सूर्यवंशी, सुशिल दहिमडे, निलेश पाटील, श्रीनिवास चोले, भरत चौधरी, सैय्यद अली यांचा ही स्पर्धा आयोजकांर्तेसत्कार करण्यातआला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन क्रीडा शिक्षक लखन थोरात यांनी केले.स्पर्धा यशस्वीहोण्यासाठी हस्ती स्कूल क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय, क्रीडा शिक्षक दुर्गेश पवार, विशाल पवार, निलेश धनगर व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*