मुसाजी सन्सतर्फे इद-ए मिलाद कार्यक्रम

0

पिंपळनेर । येथील मुसाजी सन्सच्या नातवंडातर्फे रनाळा येथे एकता व शांततेसाठी ईद-ए-मिलाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्काऊट बॅन्ड पथकाच्या संचलनात जुलूस काढण्यात आला.

पिंपळनेर येथील मुसाभाई सराफ अली पिंपळनेरवाला यांनी 1960 पासून दरवर्षी रनाळा येथे ईद-ए-मिलाद हा कार्यकम सुरु केला होता.

आजोबा स्वर्गवासी झाले तरी त्यांचा शांतता व एकतेचा संदेश देणारा उपक्रम त्यांचे विविध शहरात राहणार्‍या नातवंडांनी रनाळे येथे मोठ्या उत्साहात साजरा केला.

रनाळे गावातून स्काऊट गाईड बॅन्डच्या तालावर जुलूस काढण्यात आला. शेवटी बोहरी समाजाच्या मशिदीत कार्यक्रमाचा समारोप झाला.यावेळी धर्मगुरु शेख महंमद हुसेनभाई यांच्या उपस्थितीत शांततेचा संदेश, प्रवचन (वाहेज), प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित समाज बांधवांना स्नेहभोजन देण्यात येवून कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाचे आयोजन मुसाभाई पिंपळनेरवाला यांच्यासह मुंबई, नाशिक, पुणे, सुरत, मालेगाव, संगमनेर, पिंपळनेर व नंदुरबार येथील महंमदीभाई, हुझेफाभाई, मुर्तूझाभाई, मुस्तफाभाई, हाकीलभाई, अली अजगर, हुसेनभाई, ताहाभाई, याह्याभाई, खोमजभाई यांनी केले. 1960 पासून मुसाभाई यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली होती. 35 ते 40 वर्षापर्यंत कार्यक्रम सुरु आहे. आता नातवंडांनी ही प्रथा पुढे सुरु ठेवल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*