दापोरा येथील शहिद जवानाचा पुतळा अनावरण

0

सोनगीर । धुळे तालुक्यातील दापोरा येथील शहीद जवान रोहिदास प्रताप पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण शिंदखेडा येथील बालाजी संस्थानचे मठाधिपती हभप मेघश्याम महाराज यांच्या हस्ते झाले.माजीमंत्री रोहिदास पाटील अध्यक्षस्थानी होते.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्यासह जि.प.चे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, शहीद जवान रोहिदास यांचे वडील प्रताप पाटील, आई प्रमिला पाटील, भाऊ वसंत पाटील, पत्नी नीलिमा पाटील, ब्रिजलाल पाटील, इंदिराबाई पाटील, दिलीप पाटील, प्रा. प्रदीप दीक्षित, प.स.सदस्य मणीलाल पाटील माजी सरपंच पंकज पाटील, वसंत पाटील, दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, किरण पाटील, मुन्ना शेख, माजी सरपंच अशोक पाटील, गाव परिसरातील आजी-माजी सरपंच सोसायटी चेअरमन ग्रा. प. सदस्य गावातील स्त्री-पुरुष तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजीमंत्री रोहिदास पाटील यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले की, शहीद जवान रोहिदास पाटील यांच्या बलिदानामुळे जिल्ह्यातील दापोरा गावाचे नाव उज्वल केले आहे.

शहीद जवान रोहिदास पाटील यांच्या पत्नी श्रीमती नीलिमा पाटील यांना शासकीय सेवेत नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.

पुतळा अनावरण व प्रतिमा पूजन हभप मेघश्याम महाराज यांच्या हस्ते झाले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, आरिफ पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. मेघश्याम महाराज यांनी काव्य वाचनातून आदरांजली व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*