अपंग बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0

धुळे । जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी अपंगाना अपमानास्पद वागणुक दिल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत प्रहार अपंग क्रांती आंदोलन व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन केले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपंगाच्या विविध मागण्यासाठी दि.23 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डी.गंगाथरन डी. यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र मुख्यकार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण यांनी अपंगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत अपंगाना अपमानास्पद वागणुक दिली.

अपंगांना विविध योजनाचा हक्क मिळावा, यासाठी अपंग संघटनेच्यावतीने निवेदन तक्रारी अर्ज, स्मरणपत्र, देवून आंदोलन करावे लागतात.

ते करण्याची वेळ न येता त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा. त्याकरीता त्यांना अपंग बांधव निवेदन द्यावयास गेले असता, त्यांनी अपंगांना अपमानास्पद वागणूक देवून त्यांच्या कॅबिनमधुन हाकलून लावले. अपंग बांधव त्यांच्या व्यथा मांडतच होते. ते बाहेर जात नाही, हे लक्षात घेवून गंगाथरन हे कॅबिनच्या बाहेर निघून गेले.

अपंगांना दिलेल्या अशा अपमानास्पद वागणुकीबद्दल आज गंगाथरन यांचा निषेध व्यक्त करुन अपंग दिन साजरा करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

रामलाल जैन, ईश्वरभाऊ बोरसे, देविदास सोनार, अरुण पाटील, भरत वाघ, महेंद्र दगा पाटील, श्रीमती मंदाकिनी गायकवाड, शितल चव्हाण, ज्ञानेश्वर गुरव, युवराज सोनवणे, संजय सोनवणे, छगन अमृतकर, किरण पाटील, संजय पाटील किशोर गुजराथी, नंदुभाऊ रायते, विजय बोरसे, शरद शेख, उषा शिंदे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*