खा.सातव यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध

0

धुळे । सध्या गुुजरात राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने साम- दाम -दंड -भेद यंचबरोबर पैशांचाही जोरदार उपयोग केला जात आहे. त्याची पुनरावृत्ती राजकोट येथे दिसून आली.

काँग्रेस पक्षाचे उमेदवार इंद्रनिल राजपगुरु हे गुजरातचे मुख्यमंत्री यांच्याविरोधात राजकोट गुजरात येनि निवडणूक लढवित आहेत. कुठलेही कारण न देता पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याचप्रमाणे सौराष्ट्र विभागाचे प्रभारी अ.भा. काँग्रेस पक्षाचे सचिव व खा.राजीव सातव यांनाही अटक करण्यात आली.

याचा जाब विचारण्याकरीता गेले असता तेथील पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करीत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले.
या पोलीसांच्या कृत्याच्या निषेध करीत असल्याचे धुळे लोकसभा युवक काँग्रेसचे सचिव अलोक रघुवंशी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

या हल्ल्यात सहभागी असलेल्या पोलिसांची तत्काळ चौकशी करून यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशीही मागणी युवक काँग्रेसचे सचिव अलोक रघुवंशी, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश काटे, तौसिफ खाटीक, आयुब खाटीक, धुळै तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव पाटील, नाजनीन शेख, प्रभा परदेशी व धुळे युवक काँग्रेस व धुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*