स्थायी समिती अध्यक्षाचा अन् गुड्डयाचा काय संबंध ?

0

धुळे । राष्ट्रवादीच्या स्थायी समिती अध्यक्षाचा अन् गुड्डयाचा काय संबंध? त्यांच्या भावाला पोलीसांनी मोक्का कशाकरीता लावला ? असे सवाल उपस्थित करीत सतीष मांगले संदर्भात झालेल्या आपल्यावरील आरोपांची सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधिशांकडून चौकशी कररून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होऊन जाऊ द्या. त्यासाठी कोणत्याही टेस्टला सामोरे जायला मी तयार आहे. मात्र गुड्डया चोर प्रकरणातसुध्दा टेस्ट होवून जावू द्या, असे आव्हान आ.अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला दिले आहे.

येथील गुलमोहर रेस्टहाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सतीष मांगलेप्रकरणी राष्ट्रवादीकडून झालेल्या आरोपांचा त्यांनी खरपूर समाचार घेतला. तेजस गोटे, दिलीप साळूंखे, वैभवी दुसाणे, संजय बगदे, योगेश मुकूंदे आदी उपस्थित होते.

मी ढाण्या वाघ !
सत्य कबूल करायला, येणार्‍या प्रसंगाला सामोरे जाण्याकरिता मर्दाची छाती लागते.काही झाले की मी पोलिसांना, अधिकार्‍यांना दम दिला, दबाव आणला, धमक्या दिल्या असा टाहो फोडला जातो.वाघाचं कातडं पांघरल्याने गाढवाला वाघ होता येत नाही.

मी ढाण्या वाघ आहे, मोक्कासारख्या गंभीर गुन्हयात मला फसवून पिंजर्‍यात अडकवलं, पण वाघ तो वाघच असतो. सतीश मांगले ब्लॅकमेलर आहे, याच ब्लॅकमेलरचा उपयोग राधेश्याम मोपलवार याने माहिती काढण्याकरीता केला होता, असेही आ. गोटे यावेळी म्हणाले.

मी पवार आहे की भुजबळ ?
‘मी मांगले कुटुंबीयांना मदत केली’ हे हजारदा सांगितले. पण ज्यावेळी त्याचं खरं स्वरुप समजले, तेव्हा सर्वांसमक्ष मी त्या दोघे पती-पत्नीला हाकलून लावले. नंतर त्यांच्या आई-वडीलांना सुध्दा माझी पायरी चढू नका,मी तुम्हाला हाकलून देइन, अशा शब्दात खडसावलं.

मी याप्रकरणी पंतप्रधान,मुख्यमंत्री, सीबीआय,सीव्हीसी, इन्कम टॅक्स,आयबी, मुख्य न्यायाधिश यांनादेखील पत्रे लिहिली असून मला उत्तरेही आली आहेत.

माझा जबाब स्वत: सीबीआय डायरेक्टरांनी नोंदवून घेतला.जे मी केलं, ते केलच. नाकबुल करायला मी काय शरद पवार की छगन भुजबळ नाही, असेही आ. गोटे यावेळी म्हणाले.

चौधरी बंधूंशी गुड्ड्याचे काय संबंध ?
गुड्डयाची हत्या होण्यापूर्वीच्या रात्री नेहरु चौकात उभे राहून गुड्डया चोर कोणाला शिव्या देत होता? पालिका रेकॉर्ड जाळल्याप्रकरणी गुड्डया नासिकरोड जेलमध्ये असतांना चौधरी बंधु गुड्डयाची भेट का घेत होते?

स्वयंपाक गॅसचा काळाबाजार करण्यासाठी पारोळा रोडला लागून असलेल्या कुणाच्या गोडावूनवर पालिका जळीत कांडानंतर कुणी कुणाला लपवून ठेवले होते?

कुठल्या चौधरी बंधूशी त्याचे आर्थीक लागेबांधे होते? गुड्डयाची हत्या झाल्यानंतर लगेचच ऐंशी फुटी रस्त्यावरील कदमबांडे यांच्या बंगल्यावर 20-25 मोटर सायकली, 4/5 गाडया कशासाठी एकत्र झाल्या होत्या? असे सवालही आ.गोटेंनी यावेळी उपस्थित केले.

भुजबळ,कदमांवर पवारांचे पांघरून
राज्याचे प्रामाणिक मुख्यमंत्री माझ्यापुढे ‘हतबल’ झाल्याचे म्हणणारे मुख्यमंत्र्यांना शरद पवार समजता काय? आ.रमेश कदम अण्णाभाऊ साठे महामंडळला लुटत होते, तेव्हा त्यांच्याविरुध्द ब्र काढायची हिम्मत शरद पवारांची कधी झाली नाही. उलट त्यांच्या कृत्यांवर पांघरुण घातले. भुजबळांना तर शरद पवारांनीच दहावेळा क्लिन चिट दिली होती, असेही आ. गोटे म्हणाले.

मुख्यमंत्री कच्चे नाहीत
सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशांमार्फत माझी चौकशी करावी, दोषी आढळलो तर, माझ्याविरुध्द कठोरातील कठोर कार्यवाही करावी, असे माझे जाहीर आव्हान आहे. ज्यांनी माझ्याविरुध्द तक्रारी केल्या ते थकले पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना किंमत दिली नाही. भाडोत्री विरोधकांची किंमत न कळण्याइतपत मुख्यमंत्री कच्चे नाहीत, असेही आ. गोटेंनी स्पष्ट केले.

पाहीजे ती टेस्ट करा !
तेलगीने लाय डिलेक्टर ब्रेन मॅपिंगमध्ये शरद पवार, अन् छगन भुजबळांचे नाव घेतले होते, ‘पवार, भुजबळ मेरे बॉस’ असे तेलगीही म्हणाला होता, त्याचे पुढे काय झाले? त्यामुळे मांगले, मोपलवार प्रकरणात नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टरच काय आणखी हवी ती टेस्ट करा, असे आव्हानही आ. गोटे यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

*