सारंगखेड्यात 193 घोडयांची विक्री, 47 लाखांची उलाढाल

0

सारंगखेडा – सारंगखेडा येथील यात्रौत्सवास 1600 घोडे दाखल झाले असून आजअखेर 193 घोडयांची विक्री झाली असून त्या माध्यमातून 47 लाख 11 हजार 400 रुपयांची उलाढाल झाली आहे.

येथील श्री एकमुखी दत्तप्रभुंच्या यात्रौत्सवास दत्त जयंतीपासून सुरुवात झाली आहे. घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील यात्रौत्सवास सुमारे 1600 घोडे दाखल झाले आहेत.

यात्रेच्या दुसर्‍या दिवशी सुमारे 107 घोडयांची विक्री झाली असून त्यातून 20 लाख 22 हजार 100 रुपयांची उलाढाल झाली आहे.

आतापर्यंत एकुण 193 घोडयांची विक्री झाली असून त्या माध्यमातून 47 लाख 11 हजार 400 रुपयांची उलाढाल झाली आहे.

LEAVE A REPLY

*