शिवसेनेचा अधिष्ठाता डॉ.गुप्ता यांना घेराव

0
धुळे / भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्यांसाठी अधिष्ठाता डॉ.गुप्ता यांना शिवसेनेतर्फे घेराव घालण्यात आला व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत प्लेटलेट उपलब्ध करण्याची सोय नाही.
डेंग्यू, मलेरिया व इतर अनेक आजारांमध्ये प्लेटलेटची मोठ्या प्रमाणात गरज भासते. परंतु शासकीय महाविद्यालयात प्लेटलेट उपलब्ध नसल्याने उपचार करण्यात अडथळे निर्माण होतात.
अनेक गरीब रुग्ण प्लेटलेटची गरज असल्यामुळे खाजगी दवाखान्यात आर्थिक परिस्थिती नसतांना देखील उपचार घेतात. प्लेटलेटचा खर्च देखील मोठा आहे.
सिंगल डोनर प्लेटलेट्ची एक पिशवी खाजगी रक्तपेढीत किमान आठ हजार रुपयांना मिळते आणि रँडम डोनर प्लेटलेट्ची पिशवी किमान आठशे रुपयांना मिळते. डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार आता पावसामुळे फोफावतील.
त्यामुळे शासकीय महाविद्यालयात प्लेटलेट व इतर रक्त घटकांची सोय उपलब्ध करून गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा.
शासकीय महाविद्यालयात धुळे जिल्ह्यातील तसेच जळगाव नाशिक नंदुरबार व मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील रुग्ण देखील दाखल होतात. बाह्यरुग्ण विभाग व आंतर रुग्ण विभाग येथे रोज येणार्‍या रुग्णांची संख्या हजारात आहे.
परंतु आज पर्यंत शासकीय महाविद्यालयात रुग्णांसाठी कायमस्वरूपी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय तातडीने करण्यात यावी.

शहर आणि जिल्ह्याला अनेक महामार्गांनी वेढले आहे. अपघात होऊन दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे अशा परिस्थितीत शासकीय महाविद्यालयात सी.टी.स्कॅन मशीन सुस्थितीत असणे अपेक्षित आहे परंतु तसे मात्र प्रत्यक्ष दिसून येत नाही.

अस्थिरोग विभागातील ऑपरेशन थियेटर मधील सी- आर्म मशीन देखील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. सी.टी. स्कॅन मशीन व सी आर्म मशीन वेळोवेळी नादुरुस्त असल्यामुळे अनेक रुग्णांना तातडीचे उपचार मिळण्यास विलंब होतो.

सी. टी स्कॅन सेवा व सी-आर्म मशीन सुरळीत व सुस्थितीत करावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
अधिष्ठाता यांच्या सोबत चर्चा करतांना शिवसेनेच्या डॉ माधुरी बोरसे व इतर पदाधिकार्‍यांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत करण्याची भुमीका घेतली.

 

LEAVE A REPLY

*