रस्तालुट करणार्‍या तिघांना मुद्देमालासह अटक

0

नंदुरबार । नंदुरबार-धानोरा रस्त्यावर रस्तालुट करणार्‍या टोळीला पकडण्यात पोलीस दलाला यश आले आहे. याबाबत मुद्देमाल हस्तगत करून तिघांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली महिती अशी की, एजाज खान शेरखान पठाण हे मोटर सायकलीने खांडबारा येथून नंदुरबार येथे परत येत असताना सायंकाळी पाच वाजेचा सुमारास भादवड गावाजवळ अज्ञात तीन इसमांनी अडवून शस्त्राचा धाक दाखवला.

त्याच्याकडून रोख रक्कम दोन बायोमॅट्रीक डिव्हाईस 4, मोबाईल हॅन्डसेट, मोबाईल रिचार्ज व्हाऊचर असा एकूण 21 हजार 825 रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.

त्यामुळे विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या भागात लागोपाठ ही दुसरी रस्तालुट असल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक संजय पाटील यांना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनीही आपल्या कर्मचार्‍यांसह परिसरात तपास सुरू केला.

तपासादरम्यान बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यात नळवे बु. ता.नंदुरबार येथे दोन व करणखेडा येथीेल एक आरोपीचा सहभाग आहे.

त्यानुसार सदरा संशयीत इसमांबाबत माहिती काढून त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. त्यांच्या हालचाली संशयीत असल्याची खात्री झाल्यानंतर तिन्ही आरोपींना वेगवेगळया ठिकाणाहून ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालापैकी चार मोबाईल, दोन बायोमॅट्रीक डिव्हाईस, मोबाईल रिचार्ज व्हाऊवर, मोबाईल रिचार्ज व्हाऊचर, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 57 हजार 225 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून रस्तालुटीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.

तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पेालीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, सपोनि गणेश न्हायदे, असई अनिल गोसावी, रविंद्र लोंढे, पो.कॉ. पंढरीनाथ ढवळे, रविंद्र पाडवी, विकास पाटील, योगेश सोनवणे, विनोद जाधव, दिपक गोरे, पोना.जगदिश पवार, प्रमोद सोनवणे, भटु धनगर, गोपाल चौधरी, संदिप लांडगे, तुषार पाटील, पोशि मोहन ढमढेरे, पंकज महाले, राहुल भामरे, जितेंद्र अहिरराव, विकास अजगे, जितेंद्र ठाकूर, किरण मोरे, महेंद्र सोनवणे तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि धनंजय पाटील, पो.कॉ. मोतीराम बागुल, पो.कॉ. तुषार पाडवी, विजय वळवी, विजय पाडवी यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

*