आ.गोटेंचा खंडणी वसुलीचा धंदा !

0

धुळे । आ.अनिल गोटे यांचे संभाषण असलेली ऑडीओ क्लिप आमच्या हाती लागली आहे. त्यामध्ये आ. गोटे हे कैलास गौडा नावाच्या व्यापार्‍याला फोनवर धमकी देत आहेत.

आ. गोटे यांनी खंडणीखोर सतीश मांगलेच्या बचावासाठी आमदार पदाचा दूरूपयोग केला आहे. स्वतःच्या लेटरहेडवर वेळोवेळी सतीश मांगले, श्रद्धा मांगले यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.

मांगलेच्या माध्यमातून आ. गोटेंचा खंडणी वसुलीचा धंदा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी आज केला.

यावेळी माजी आ. राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

यावेळी बोलताना मनोज मोरे म्हणाले की, ठाणे येथील खंडणीविरोधी पथकाने एक कोटी रुपये घेताना सतीश सखाराम मांगले व श्रद्धा मांगले यांना डोंबिवली येथून ताब्यात घेतले.

आ.गोटेंवर मोक्का दाखल करा !

आ. अनिल गोटे आणि सतिष मांगले यांचे जुने संबंध असून खंडणी वसुलीचा धंदा मांगलेच्या माध्यमातून आमदार करीत असतात. तेलगी सारखाच मांगलेचा वापर आ. गोटे करुन घेत असून पोलिस यंत्रणेवरदेखील दबाव टाकण्याचे काम आमदारांकडून होत आहे. यामुळे या प्रकरणाची कसुन चौकशी करुन मोक्काचा गुन्हा दाखल करावा. त्यात आ. अनिल गोटेंना सहआरोपी करावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी बोलतांना मनोज मोरे यांनी सांगितले की, आ.गोटेंशी मांगलेंचे संबंध उघड झालेले असल्याने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी म्हणून आम्ही शासन दरबारी आवाज उठविणार आहोत. कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे. त्याचप्रमाणे खंडणी विरोधी पथकाला पत्र देणार आहोत. मी कधी पोलिसांना फोन करत नाही, कोणासाठी पत्र देत नाही असे सांगणारे अनिल गोटे आपल्या लेटरहेडवर मांगलेच्या बचावासाठी पोलिस स्टेशनला पत्र देतात. त्याच प्रमाणे व्यापार्‍याला फोनवर धमकवतात. धुळे शहराला गुन्हेगारी मुक्त करण्याची भाषा करणारे आ. गोटे गुन्हेगारासाठी पोलिसांना पत्र देतात कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे मुंबई क्राईम ब्रॅचचे सीपी संजय सक्सेना यांचा गोटेंकडून खाजगी पीएसारखा वापर केला जात आहे, असा आरोपही मनोज मोरे यांनी केला. उदय जयवंत पारसेकर या वाहन विक्रेत्याने बोरीवली पोलिस ठाण्यात आ. अनिल गोटेंच्या विरोधात तक्रार दाखल केली असून यात गोटेंकडून जीवे ठार मारण्याची धमकी मिळत असल्याचे पारसेकरने म्हटल्याचे मनोज मोरे म्हणाले.

 

सतीष मांगले, श्रद्धा मांगले यांना रंगेहात अटक केल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन, सतीश मांगले हा आ.अनिल गोटे यांचा मानसपुत्र असल्याचे म्हटले होते.

मांगलेने मोपलवार या अधिकार्‍याला ब्लॅकमेल करून 10 कोटींची खंडणी मागितली होती. परंतु तडजोडीअंती 7 कोटी खंडणीची रक्कम ठरली. त्यापैकी 1 कोटी रु रोख घेतांना मांगले याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली.

या प्रकरणात आ.गोटेनी आपली भूमिका स्पष्ट करावी व आ. गोटे यांनाही सहआरोपी करावे, अशी आमची मागणी आहे. मात्र ‘मांगले हा माझ्याकडे 4 महिन्यापूर्वी आला होता व मोपलवार प्रकरण जास्त ताणू नका वगैरे सांगत होता’ असे आ. गोटेंनी कबुल केले आहे.

यातूनच आ.गोटेची लबाडी उघडी पडली. मांगले आणि गोटे हे एक ‘सिंडीकेट’ असून मांगले हायटेक क्रिमिनल आहे. या मांगलेने आतापर्यंत बर्‍याच लोकांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे.

सतीश मांगले हा मर्सिडीसारख्या महागड्या गाड्यांमधून फिरायचा.या गाड्यांवर लाल दिवादेखील असायचा. कधी तो लोकांना मोठा पोलीस अधिकारी असल्याचे तर कधी फिल्म प्रोड्युसर असल्याचे सांगायचा.

 

होय, मला सहआरोपी करुन मोक्का लावाच !


दरम्यान, राष्ट्रवादीने केलेल्या आरोपांसदंर्भात आ. अनिल गोटे यांनी सोशल मिडीयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. यात ‘मला सहआरोपी करुन मोक्का लावाच’ असे आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिले असून उद्या दि.4 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन या सर्व आरोपांचा आपण खुलासा करणार असल्याचे आ. गोटेंनी म्हटले आहे. यासंदर्भात न्यायालयात अवश्य जा.माझी निवृत्त न्यायधिशांकडून चौकशी करण्याची मागणी मी स्वतःच करणार आहे. तुमच्या नेत्यांनाही मागणी करायला सांगा. रमेश कदमच्या लाभार्थ्यांमधे तुमचेच नेते आहेत.भाजपाचे मुख्यमंत्री म्हणजे भ्रष्टाचारी भुजबळांपुढे नांग्या टाकणारे शरद पवार वाटले का? असा सवालही आ. गोटेंनी उपस्थित केला आहे.

 

 

यातून लोकांना फसविणे व ‘स्ट्रगलर अ‍ॅक्ट्रेस’चा गैरफायदा घेणे, आणि शानशौकतचे जीवन जगण्याचा सतीष मांगलेला छंद होता. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना फसवण्याचा त्याचा धंदा होता आणि यासाठी मांगलेला आ. गोटे हे सर्व मदत करायचे.

मुंबई क्राईम ब्रांचपासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत आ.गोटे हे मांगलेला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते.आपली राजकीय ताकद, मुंबई क्राईम ब्रँचशी असलेले संबंध याचा वापर आ. गोटे हे लोकांना फसवण्यासाठी, धमकविण्यासाठी करत होते.

 

LEAVE A REPLY

*