कचरा डेपोची आयुक्तांकडून पाहणी

0

धुळे । शहरातील वरखेडी रोडवरील कचरा डेपो आणि गांडूळ खत प्रकल्पाची पाहणी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली.
नुकत्याच झालेल्या महासभेत वरखेडी रोडवरील कचरा डेपोचा प्रश्न विरोधी पक्षनेते गंगाधर माळी यांनी उपस्थित केला होता.

त्या अनुशंगाने आज आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक संजय गुजराथी, आरोग्य विभागाचे रत्नाकर माळी, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते श्री.माळी यांनी आयुक्तांना कचरा डेपोची अवस्था दाखवली. कचरा उचलून आणल्यानंतर तो रस्त्यावर फेकला जातो तर गांडूळ खत प्रकल्पात एकही गांडूळ नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, कचरा डेपोची मुदत संपली असून त्वरित डेपो स्थलांतरीत करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माळी यांनी दिला.

LEAVE A REPLY

*