ग्रंथोत्सवाचे शानदार उद्घाटन

0

धुळे । पुस्तकांच्या वाचनातून ज्ञान आणि आत्मविश्वास वाढतो. पुस्तके आपले सोबती असून एकटेपणा वाटत नाही. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथोत्सवातून पुस्तकांची खरेदी करीत वाचनाची सवय लावून घ्यावी, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी येथे केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित धुळे ग्रंथोत्सव 2017 ला आजपासून आयएमए सभागृहात सुरूवात झाली. त्यावेळी डी. गंगाथरण अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, लोककवी प्रशांत मोरे, सहाय्यक ग्रंथालय संचालक आशिष ढोक, जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष आर. ओ. पाटील, प्रा. डॉ. दत्ता परदेशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गंगाथरण डी. म्हणाले, घरात एकटे असताना पुस्तकांसारखा दुसरा सोबती नाही. त्यामुळे पुस्तक वाचनासारखे चांगले व्यसन आपण लावून घेतले पाहिजे. मी सुध्दा तीन वर्षांपूर्वी मराठी शिकलो. पुस्तकांच्या वाचनामुळे मराठी भाषा अवगत करीत आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

आयुक्त श्री. देशमुख म्हणाले, आम्ही शहर स्वच्छ करतो. मात्र, पुस्तके मनाची स्वच्छ करतात. त्यामुळे ग्रंथाशिवाय पर्याय नाही. तसेच लोकराज्य मासिकाचा वाड्मयीन दर्जा उच्च आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

श्री. मोरे म्हणाले, ग्रंथोत्सवातील पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकांची एक ओळ आयुष्याचा कायापालट करुन जाते. श्री. ढोक म्हणाले, वाचन चळवळ वृध्दींगत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. म्हस्के यांनी प्रास्ताविकात केले. जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.परदेशी यांनी आभार मानले.

ग्रंथदिंडीचे उदघाटन-सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी महापौर कल्पना महाले, प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. विद्यार्थी ग्रंथालय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. ग्रंथदिंडी काढण्यात आली.

लोकराज्यचा स्टॉल-गरुड वाचनालयाच्या आवारात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले असून जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयातर्फे यांच्यातर्फे जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली लोकराज्य विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे.

या स्टॉलला आज सकाळी प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिकेचे आयुक्त श्री. देशमुख, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. म्हस्के, कवी जगदीश देवपूरकर, शाहीर सुभाष कुलकर्णी आदींनी भेट दिली. माहिती सहाय्यक गोपाळ साळुंखे, दूरमुद्रक चालक मनोहर पाटील, लिपिक नि टंकलेखक संदीप गावित आदींनी स्वागत केले.

आज समारोप-दोन दिवसीय ग्रंथोत्स्वाचा समारोप होईल. तत्पूर्वी रविवारी सकाळी 10.30 वाजता प्रभावी वाचन माध्यमे या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. एल. जे. सोनवणे अध्यक्षस्थानी असतील. प्रा.विलास चव्हाण, प्रा.डॉ. फुला बागूल, प्रा.सदाशिव सूर्यवंशी, प्रा. डॉ.पुष्पा गावित सहभागी होतील.

सकाळी 11.30 वाजता शाहिरीचा कार्यक्रम होईल. अप्पा खताळ, श्रावण वाणी, शंकर पवार, सुभाष कुलकर्णी, गंभीर बोरसे, भटू गिरमकर, माणिकराव शिंदे, नानाभाऊ पाटील सहभागी होतील. दुपारी 1.30 वाजता सुरू होणार्‍या दुसर्‍या सत्रात कवी संमेलन होईल. प्राचार्य रत्नाताई पाटील अध्यक्षस्थानी असतील. रमेश बोरसे, प्रभाकर शेळके, प्रा. रमेश राठोड, डॉ. सचिन चिंगरे, प्रभा बैकर, सुनंदा वैद्य, सतीश पेंढारकर, लतिका चौधरी, मंगला रोकडे, नाना महाजन, पापालाल पवार, गोकुळ पाटील, राजेंद्र जाधव, चेतना चौधरी, दत्तात्रय कल्याणकर, कमलेश शिंदे, नरेंद्र खैरनार, शैलेश चव्हाण, गणेश पाटील, मोहन मोरे, मीना भोसले, प्रवीण पवार, बाळकृष्ण शिंदे, राम जाधव सहभागी होतील.

याच दिवशी दुपारी 4 वाजता समारोप होईल. जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा कोशागार अधिकारी गजानन पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. नागरिकांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, प्रकाशन संघटना प्रकाश पाटील, साहित्य परिषदेचे प्रा.अनिल सोनार, सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*