मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक

0

धुळे । इस्लाम धर्माचे प्रतिक हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शहरातील विविध मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा समारोप पांझरा नदी किनारी असलेल्या लहान पुलाजवळ झाला.

इस्लाम धर्माचे प्रतिक हजरत मोहम्मद पैगंबर जयंती आज साजरी करण्यात आली. या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीला शहरातील मनोहर चित्रमंदिरापासून सुरुवात झाली. आग्रारोड मार्गाने ही मिरवणूक येवून मिरवणुकीचा समारोप लहान पुलाजवळ झाला.

शहरात 570 पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्डच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, तीन पोलिस उपअधीक्षक, पाच पोलिस निरीक्षक, दहा सहाय्यक पोलिस निरीक्षक, 22 पोलिस उपनिरीक्षक, 354 पुरुष पोलिस कर्मचारी, 30 महिला पोलिस कर्मचारी, 122 पुरुष होमगार्ड, 32 महिला होमगार्ड तसेच दोन आरसीपी पथक, एक महिला आरसीपी पथक, एसआरपीएफच्या दोन प्लॅटून असा बंदोबस्त लावण्यात आला होता.

वाहतुकीचा प्रश्न निर्माण होवू नये किंवा काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आज दि.2 डिसेंबर रोजी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता.

नगावबारी, देवपूर, पारोळा रोड चौफुली, चाळीसगाव चौफुलीमार्गे शहरात येणार्‍या व बाहेर जाणार्‍या एस.टी.बस गुरुद्वारामार्गे शहरात आल्या व दसेरा मैदान, रेल्वेस्टेशन चौक, पोलिस मुख्यालय गेट चौकातून बसस्थानकात बसेस आल्या व गेल्या.

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक व लहान पुलाजवळ बॅरेकट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांनी उत्साहात मिरवणूक काढली.

LEAVE A REPLY

*