गळफास घेवून एकाची आत्महत्या

0

धुळे । घोडदे, ता.साक्री येथे खळ्यातील झोपडीत 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत साक्री पोलिस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, घोडदे, ता.साक्री शिवारात असलेल्या खळ्यातील झोपडीत सुभाष भाऊजी क्षिरसागर (वय 50) हा रहात होता.

याने दि.1 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता झोपडीत असलेल्या लाकडी दांडीला मफलर बांधून गळफास घेतला. त्याला सुभाष भाऊजी क्षिरसागर यांनी साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तेथे डॉक्टरांनी तपासून सुभाषला मृत घोषित केले. सुभाषने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याबाबत विकास दगडू पाटील यांनी साक्री पोलिस ठाण्यात माहिती दिली.

त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकाँ व्ही.बी.पाटील हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*