स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल; कापडण्याचा जलकुंभ धोकेदायकच

0

कापडणे । येथील जीर्ण व कालबाह्य जलकुंभ हटविण्याची मागणी आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर सबंधित विभागाने स्ट्रक्चरल ऑडीटचे आदेश दिले होते.

या स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल पाणीपुरवठा विभागास प्राप्त झाला असुन या तपासणी अहवालानुसारही ही टाकी धोकेदायकच ठरली आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ही टाकी पाडण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. देशदूतने याबाबत सर्वप्रथम वृत्त प्रसिध्दीस दिले होते. आता या टाकीच्या निर्लेखनाबाबत गती देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत व दि.2 ऑक्टोंबरच्या ग्रामसभेत हा विषय मंजूर करण्यात आला होता. आता या जीर्ण पाण्याच्या गंभीर विषयाला लालफितीत न अडकवता टाकी हटविण्यास तात्काळ परवानगी देण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.

येथील 41 वर्षापुर्वीच्या जलकुंभाचे आयुष्य कधीच संपले आहे. हा कालबाह्य जलकुंभ मात्र काढला जात नसल्याने दिवसेदिवसं धोका वाढत जात आहे.

त्या कालावधीची एखादी इमारत व जलकुंभ याची तुलना करणे निश्चितच चुकीचे ठरु शकते असे ग्रामस्थांचे मत आहे व यास सबंधित विभागाने दुजोरा दिला आहे.

यात इमारत व पाण्याची टाकी याचा वापराचा सारासर विचार यात करावाच लागतो. पाणीपुरवठा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने 9 वर्षापूर्वी, हा जलकुंभ ताबडतोब काढण्याचा आदेश दिला होता परंतु तोही गांर्भीयाने घेतला गेला नाही.

सबंधित विभागानेही गेल्यावर्षी याबाबतचे निर्देश ग्रा.पं.ला दिल्याचे समजते. याबाबत दै.देशदूतने कापडण्यातील जलकुंभ मोजतोयं अखेरच्या घटका या मथळ्याखाली सर्वप्रथम वृत्त प्रसिध्दीस दिले. यात जलकुंभाच्या धोक्याबाबतचे मुद्देही नमुद केले होते.

गावातील तत्कालीन लोकसंख्येच्या आधारावर उभारलेला, 15 हजार गॅलन क्षमतेच्या या जलकुंभास अक्षरश: तडे गेले आहे. येथील प्रमुख रहदारीच्या रस्त्यालगत व जि.प.शाळेच्या प्रांगणात हा गावासाठीचा जलकुंभ आहे.

याचे जुन्या पध्दतीचे काम असल्याने हा जलकुंभ अतिशय धोकेदायक बनला आहे. जलकुंभाच्या एका बाजुला घरे तर दुसर्‍या बाजुला जि.प.शाळा व अंगणवाडी आहे. शाळेतील मुले याच भागात खेळत असल्याने धोका अजुन वाढतो.
धुळे पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे या कालबाह्य जलकुंभाकडे अक्षम्य दुर्लंक्ष होत होते. दरम्यान या वृत्ताची दखल घेत आ.कुणाल पाटील यांनी या पाण्याच्या टाकीचे निर्लेखन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागास दिले आहेत.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर सबंधित विभागाने स्ट्रक्चरल ऑडीटचे आदेश दिले होते. या स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवाल पाणीपुरवठा विभागास प्राप्त झाला असुन या तपासणी अहवालानुसारही ही टाकी धोकेदायकच ठरली आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ही टाकी पाडण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

देशदूतने हा प्रश्न लावुन धरल्याने त्याची दखल घेतली आहे.या टाकीच्या निर्लेखनाबाबत गती देण्याची मागणी होत आहे.

तपासणी अहवालातील बाबी-
कापडण्यातील जीर्ण झालेल्या जलकुंभाच्या तपासणी अहवालात टाकी पाडण्याची शिफारस करतांना विविध बाबी मांडल्या आहेत. यात जलकुंभातुन होणारी पाणी गळती, बर्‍याच ठिकाणचे उघडे असलेले स्टिल, सिमेंट निघालेला भाग, क्रॅक्स व ड्रमेज झालेले कॉलम व गॅलरी, गंजुन गेलेले स्टिल, बाल्कनीत फिरणे धोकेदायक आदी बाबी या जलकुंभाच्या तपासणी अहवालात मांडण्यात आल्या आहेत. तसेच या टाकीचे 41 वर्ष वयही तुलनेने जास्त झाल्याचे या समितीचे मत आहे. या वरील गोष्टींच्या आधारावर ही पाण्याची टाकी पाडण्याची शिफारस कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*