आदिवासी संघटनेचा मोर्चा

0
पिंपळनेर / आदिवासींच्या न्यायहक्कासाठी व विविध मागण्यासाठी पिंपळनेर अपर तहसील कार्यालयावर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा पिंपळनेर आदिवासी एकता परीषद व एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषदेतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला व 19 मागण्यांच लेखी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

मागील वर्षभरात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा पिंपळनेर, आदिवासी एकता परिषद, एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषद महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासींच्या विविध मागण्या संदर्भात निवेदने देण्यात आले होते.

परंतू वरील विभागाकडून आश्वासनाविषयी कोतेही ठोस पावले उचलेले नाहीत. आदिवासी जनतेची फसवणूक होवून समाजाची परिस्थिती गंभीर व वेठबिगारीची झाली असून त्यास शासकीय यंत्रणा जबाबदार असून ते प्रामाणिकपणे न्याय देण्यास सक्षम दिसून येत नाही.

तरी झोपलेल्या शासनास व प्रशासनास झोपेतून उठवण्यासाठी आम्ही हा धडक मोर्चा काढत आहोत असे कॉ. डोंगर बागुल यांनी निवेदन अपर तहसील यांना देतांना सांगितली.

 

LEAVE A REPLY

*