धुळ्यात आजपासून ग्रंथोत्सव

0

धुळे । उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे आयोजित धुळे ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन शनिवार 2 डिसेंबरपासून करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होतील. तसेच ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

आयएमए हॉल, गरुड वाचनालय, धुळे येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 10.30 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उदघाटन होईल.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे अध्यक्षस्थानी असतील. राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, लोककवी प्रशांत मोरे प्रमुख पाहुणे असतील.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, महापौर कल्पना महाले, खासदार डॉ. हीना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. अपूर्व हिरे, आमदार अनिल गोटे, आमदार डी. एस. अहिरे, आमदार काशिराम पावरा, आमदार कुणाल पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक आशिष ढोक यांची विशेष उपस्थिती राहील.

प्रारंभी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून ग्रंथदिंडी काढण्यात येईल. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दहिते, महापौर श्रीमती महाले, प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिकेचे आयुक्त श्री. देशमुख यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन होईल. दुपारी दोन वाजता सुरू होणार्‍या दुसर्‍या सत्रात कथाकथन होईल. सुभाष अहिरे अध्यक्षस्थानी असतील. डॉ. संजीव गिरासे, डॉ. एस. के. पाटील, प्रा. योगिता पाटील, सुरेश मोरे सहभागी होतील. दुपारी 3 वाजता खानदेशी मराठी गझल मुशायरा होईल. कमलाकर देसले अध्यक्षस्थानी असतील. रावसाहेब कुवर, हेमंत जाधव, ज्ञानेश पाटील, वीरेंद्र बेडसे, योगिता पाटील, शरद धनगर, ज्ञानेश्वर भामरे, सदाशिव सूर्यवंशी, कश्मिरा पाटील, हेमलता पाटील, प्रवीण मोरे सहभागी होतील.

रविवार 3 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता ङ्गप्रभावी वाचन माध्यमेङ्घ याविषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. एल. जे. सोनवणे हे अध्यक्षस्थानी असतील. प्रा. विलास चव्हाण, प्रा. डॉ. मुला बागूल, प्रा. सदाशिव सूर्यवंशी, प्रा. डॉ. पुष्पा गावित सहभागी होतील. सकाळी 11.30 वाजता शाहिरीचा कार्यक्रम होईल. अप्पा खताळ, श्रावण वाणी, शंकर पवार, सुभाष कुलकर्णी, गंभीर बोरसे, भटू गिरमकर, माणिकराव शिंदे, नानाभाऊ पाटील सहभागी होतील. दुपारी 1.30 वाजता सुरू होणार्‍या दुसर्‍या सत्रात कवी संमेलन होईल. प्राचार्य रत्नाताई पाटील अध्यक्षस्थानी असतील. रमेश बोरसे, प्रभाकर शेळके, प्रा. रमेश राठोड, डॉ. सचिन चिंगरे, प्रभा बैकर, सुनंदा वैद्य, सतीश पेंढारकर, लतिका चौधरी, मंगला रोकडे, नाना महाजन, पापालाल पवार, गोकुळ पाटील, राजेंद्र जाधव, चेतना चौधरी, दत्तात्रय कल्याणकर, कमलेश शिंदे, नरेंद्र खैरनार, शैलेश चव्हाण, गणेश पाटील, मोहन मोरे, मीना भोसले, प्रवीण पवार, बाळकृष्ण शिंदे, राम जाधव सहभागी होतील.

याच दिवशी दुपारी 4 वाजता समारोपाचा कार्यक्रम होईल. जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा कोशागार अधिकारी गजानन पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. नागरिकांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे ग्रंथोत्सव 2017 समन्वय समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., सदस्य प्रवीण अहिरे (शिक्षणाधिकारी, माध्यमिक), रणजितसिंह राजपूत (जिल्हा माहिती अधिकारी), प्रकाश पाटील (प्रकाशन संघटना, धुळे), प्रा. अनिल सोनार (अध्यक्ष, साहित्य परिषद, धुळे), आर. ओ. पाटील (अध्यक्ष, जिल्हा ग्रंथालय संघ, धुळे), सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*