पांझरा पात्रालगतच्या रस्त्यांचे काम प्रगतीपथावर !

0

धुळे । शहरातील पांझरा नदी पात्रालगत दोन्ही बाजुने साडेपाच- साडेपाच किलोमिटर रस्ता तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

या रस्त्यांबरोबरच पांझरा नदीवर ब्रीजकम बंधारा आणि झुलता पुल बांधण्याचे प्रस्तावित आहे.सुमारे एकुण 75 कोटी रुपयांच्या या कामातील सहा कोटी रुपये झुलत्या पुलााठी वापरले जाणार आहे.

या पुलाच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्यांमुळे आणि पुलामुळे देवपुरातून जुने धुळे आणि मुंबई आग्रा महामार्गाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत.

दि.17 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी या कामाचे भूमीपुजन केले होते. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी म्हणजे दि. 15 आक्टोंबर2017 रोजी आ.अनिल गोटे यांच्याहस्ते प्रत्यक्ष या कामाला प्रारंभ झाला.

नदीच्या दोन्ही बाजूला साडेपाच-साडेपाच किलोमिटर लांबीचे हे रस्ते राहणार आहेत. कुमारनगर ते नाशिक बायपास ड्रायव्हर्शन पुलापर्यंत हे रस्ते होत आहेत.

72 फुट रूंदीचे हे रस्ते राहणार असून 10 फुट रूंदीचा जॉगींग ट्रॅक, 5 फुट रूंदीचा फुटपाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथदिवे बसविले जाणार आहेत.

त्याचप्रमाणे या दोन्ही रस्त्यांच्या बाजूला साडेपाच-साडेपाच किलोमीटर लांबीची भूमिगत पाईपलाईन करण्यात येईल. यामुळे शहरातील सर्व सांडपाणी महापालिका हद्दीबाहेर नेले येईल.

हे सांडपाणी शुध्दीकरणानंतर पाणी पांझरा नदी पात्रात सोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रभातनगरजवळ बांधण्यात येणार्‍या ब्रीजकम बंधार्‍यामुळे मार्केट कमिटीसमोरून वरखेडी रस्त्यास जोडणारा रस्ता पॉलीटेक्नीक कॉलेजपर्यंत जोडला जाणार आहे.

प्रभात नगरजवळ होणारा पांझरा नदीवरील हा आठवा पुल राहणार आहेत. यामुळ डोंगरे महाराजनगर, पारोळा रोड, 80 फुटी रोड आणि जुने धुळे भागात जाणे सोपे होईल.

होणारे दोन्ही बाजूचे रस्ते ब्रीजकम बंधार्‍याला जोडले जाणार आहेत. 190 मिटीर लांब आणि दहा मिटर रुंदीचा हा ब्रीज कम बंधारा राहणार असून त्याची चार मिटर उंची राहणार आहे.

यामुळे बंधार्‍याजवळ तीन मिटर खोलीपर्यंत पाणीसाठा होईल. त्याचप्रमाणे या ब्रीजकम बंधार्‍यामुळे एकविरा देवी मंदीर परिसर, प्रभातनगर, विद्यानगरी परिसरातील भुजल साठा वाढण्यास मदत होणार आहे.

या बंधार्‍यामुळे जुने धुळे, पारोळा रोड प्रमाणेच देवपूर व मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जाणे सोयीचे होणार आहे. दरम्यान प्रभात नगरजवळ होणार्‍या पुलामुळे डोंगरे महाराज नगरापर्यंत होणार्‍या रस्त्यासाठी जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.

त्यासाठी संबंधित शेतकर्‍यांशी प्रशासन संपर्कात आहे. राष्ट्रीय महामार्गापासून ते एकवीरा देवी मंदिरापर्यंत एका बाजुच्या रस्त्याचे काम गतीने सुरु असून प्रगतीपथावर आहे.

ही कामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने आवश्यक ती यंत्रसामुग्री मोठया प्रमाणात आणली आहे. ब्रिजकम बंधार्‍या सोबतच नाल्यावर झुलता पुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी मंजूरीची प्रक्रीया अंतिम टप्यात आहे.

LEAVE A REPLY

*