कला उत्सव स्पर्धेतील चार संघांची निवड

0

धुळे । राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कला उत्सवाचे आयोजन जिल्हा भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा संस्था येथे घेण्यात आले.

त्यात लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य व दृश्यकला या चार कला प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. सर्वोत्कृष्ठ चार संघांची कलाप्रकारानुसार नाशिक विभागीय कला उत्सवासाठी निवड करण्यात आली.

नाशिक येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत किसान विद्यालय, शिंदखेडा येथील आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. सदरीय स्पर्धेकांची राज्यस्तरावर पुणे येथे होणार्‍या कला उत्सवासाठी निवड करण्यात आली.

दृश्य कला विभागासाठी रंगकाम सिमा प्रविण आखाडे (गुरुदत्त हायस्कूल, वायपूर) हस्तकलेसाठी अलीम दिलदार खाटीक आणि शिल्पकलेसाठी जगदीश चतुर निकम (गणेश हायस्कूल, शेवाडे), चित्रकलेसाठी मयूर गंगाधर कुंभार (महाजन हायस्कूल, धुळे) यांची निवड झाली.

विभागस्तरीय स्पर्धेसाठी धुळे येथील श्री एकविरा देवी विद्यालय, कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा, परिवर्तन विद्यालय, जो.रा.सिटी हायस्कूल, गणेश हायस्कूल, शेवाडे, किसान विद्यालय, शिंदखेडा, गुरुदत्त हायस्कूल, वायपूर, महाजन हायस्कूल, धुळे येथील विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली. धुळे येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, उपशिक्षणाधिकारी जी.एम.सोनवणे, शिक्षणविस्तार अधिकारी शैलजा देवकर, अजय भदाणे, केदार नाईक, जगदीश चव्हाण, शीतल कापुरे, अशोककुमार गिरी, किरण मांडे, मेधा कुलकर्णी, रावसाहेब बैसाणे, सागर देसले, गणेश फुलपगारे, अशोक अमृतसागर, राजेंद्र भदाणे, नेपथ्य व रंगभूषा, मनोहर अहिरे, शैलजा देवकर आदींनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*