दोन पान दुकानांवर छापा : साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0

धुळे । दि.30 । प्रतिनिधी-सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनाच्या अटींचा भंग केल्याप्रकरणी दोन पान दुकानांवर छापा टाकून तीन लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांविरुध्द आझादनगर व शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील ऊस गल्लीतील सुनील सुपारी सेंटरवर छापा टाकला असता तेथे एक लाख 76 हजाराचे डीजे अरुम ब्लॅकचे 44 बॉक्स, गुडम गरमचे 92 हजाराचे 20 पाकिटे आढळून आली.

वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी सिगारेट या शासनाने ठरवून दिलेल्या योग्य आकाराचे वैधानिक चित्र व वैधानिक इशारा नसलेले पाकिट विक्री करतांना आढळून आले.

त्याने केंद्र शासनाने सिगारेट व इतर तंबाखू उत्पादनाच्या अटीचा भंग केला. त्यामुळे सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोनि मयूर किशोर पाटील यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन प्रकाश मोहनलाल आसिजा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसर्‍या कारवाईत शहरातील साखला पान दुकानावर छापा टाकून त्या ठिकाणाहून 88 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोकाँ विजय पोपट मदने यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन जाहिरातीस प्रतिबंध व व्यापार वाणिज्य व्यवहार उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनिमय अधि. 2003 चे क्र.34 चे कलम 7 (3) सह कलम 20 (2) प्रमाणे राजेश निर्मल साखलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ बडगुजर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*