दोंडाईच्याच्या दादासाहेब रावल विद्यालयात चित्रमय ग्रंथ प्रदर्शन

0
दोंडाईचा |  प्रतिनिधी : येथील दादासाहेब रावल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, शालेय पुस्तकासह विज्ञानिक, सांस्कृतीक, धार्मिक, खेळाची पुस्तके वाचनास मिळावी, याकरिता ग्रंथ व चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे खजिनदार सी. एन. राजपूत होते . दोंडाईचा येथील दादासाहेब रावल हायस्कूलमध्ये ग्रंथ व चित्रमय ग्रंथमय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे शालेय प्रशासन सचिव ललीतसिह गिरासे, उपमुख्याध्यापक बी. एन. गिरासे,पर्यवेक्षक डी. जी. गिरासे, रोटरी क्लब सिनिअर अध्यक्ष नामदेव थोरात होते. ग्रंथ प्रदर्शनात सांस्कृतिक, वैज्ञानिक, खेळ, लहान मुलाचा गोष्टी, मार्गदर्शन पर पुस्तके, खेळ, लहान मुलाच्या गोष्टी, मार्गदर्शन पर पुस्तके, थोरा मोठ्यांचे चरित्र आदी दोन हजार पुस्तके मांडण्यात आली होती.

या प्रदर्शनात हनुमान चालीसा या ग्रंथाचे चित्रमय प्रदर्शन मांडण्यात आले होते.विविध सात दोहाचे श्लोकांचे अर्थ मांडून चित्रमय स्वरूपात मांडण्यात आले. तरुण पिढी वाम मार्गाकडे झुकत असल्याचे दिसत असतानाच शालेय जीवनात मुलांमधे संस्कार रुजावेत, त्यांचे आत्मबल वाढावे, त्यास अध्यात्मची जोड मिळावी हा उद्देश ठेऊन चित्रमय ग्रंथाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले

बजरंगबली स्वत:च याबाबत मार्गदर्शन करीत असल्याचे यात दाखविण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांत एक आकर्षण निर्माण झाल्याचे दिसले.चित्रमय प्रदर्शन संकलन व आयोजन शाळेचे ग्रंथपाल संजय कुंभार यांनी केले होते. प्रदर्शनाचा लाभ सुमारे १५०० विद्यार्थ्यानी घेतला.

आज इंटरनेट व मोबाईल जमान्यातही वाचन संस्कृती जपावी, या साठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. ग्रंथ व चित्रमय प्रदर्शनाने विद्यार्थ्यांत वाचन गोडी वाढणार आहे.

विद्यार्थ्यानी या ग्रंथ संपदेचा व चित्रपमय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. वाचन संस्कृती वाढावी असे मत सी.एन.राजपूत व ललित गिरासे यांनी मांडले. सुत्रसंचलन श्रीमती जे.डी.पवार व आभार आर. आय. गिरासे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*