शिरपूर तालुक्यातील 20 गावांचा पेयजल योजनेत समावेश

0

बोराडी । दि.28 । वार्ताहर-तालुक्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी तालुक्यातील 20 गावांना मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत समावेश करून निधी मिळावा यासाठी खा. डॉ. हिना गावित यांच्यामदतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. या दोन्ही योजनांमध्ये शिरपूर तालुक्यातील 20 गावांचा समावेश करण्याच्या प्रयत्नाला यश आले आहे.

राज्यातील नागरिकांना पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या नावाने सर्वंकष योजना राबविण्याचा निर्णय राज्य व केंद्र शासनाने घेतला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना 40 लिटर पाणी उपलब्ध करुन देण्याची ही योजना आहे. आगामी चार वर्षांत ही महत्त्वाकांक्षी योजना राबिवण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी काही योजना केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त आर्थिक भागिदारीतून सुरु करण्यात आल्या आहेत.

परंतु गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे ग्रामीण पाणी पुरवठ़यावर प्रचंड ताण येत आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम सुरु करण्यात आला.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत राज्यातील केवळ प्रगतीपथावर असलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात आहे.

त्यासाठी 4 हजार 350 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्यातील पाण्याचा प्रश्न हाताळण्यासाठी केंद्र सरकारकडून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनांचे वर्गीकरण मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत हाती घ्यावयाच्या नवीन योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती अशा पद्धतीने केली आहे. मुख्यमंत्री पेयजल योजना 4 वर्षासाठी राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री पेयजल योजनेत समाविष्ट असलेले गाव-अजंदे खु, अजनाड, चांदसे, दुर्बड्या, फत्तेपूर(फॉ), हिवरखेडा, जुनेभामपूर, पनाखेड, सांगवी, उमर्दा, थाळनेर, वनावल. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत समाविष्ट असलेले गाव भोईटी (बोरमाडी पाडा), भोरखेडा, हिसाळे (मलखानपाडा), नटवाडे (खोलचौकीपाडा), जैतपूर, जोयदा (बर्डीपाडा), बोराडी, वरझडी (आंबडपाडा).

या गावांचा मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत समावेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. बबनराव लोणीकर, ना. जयकुमार रावल ना. सुभाष भामरे, खा. डॉ. हिना गावित, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुका प्रभारी डॉ. जितेंद्र ठाकूर, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश वसावे आदींचे सहकार्य लाभले.

या योजनेच्या पाठपुराव्या करिता शिरपूर ग्रामीणमधील जि.प. सदस्य संजय पाटील, पंचायत समिती सदस्य दिलीप तडवी, बालकिसन पावरा, गोमतीबाई पावरा, माजी पं.स. सभापती रतन पावरा, वसंत पावरा, सरपंच विजय भिल, गंगाराम पावरा, कैलास पावरा, शिवदास भिल, विकास पाटील, रामेश्वर पाटील, राजेंद्र बोरसे, दिलीप तुंगार, भागवत देसले, रवी वसावे, दीपक जमादार, डोंगर बोरसे, अनिल पाटील, मोहन पाटील, राजेंद्र बोरसे, कन्हैय्या पावरा, पुरुषोत्तम पाटील, विश्वनाथ पाटील, शिवानंद बंजारा, सुरेंद्र राजपूत, शिवा गिरासे, जगदीश पावरा, भोजुसिंग गिरासे आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*