दोंडाईचात फिरत्या रुग्णालयासाठी तीन कोटी

0

दोडांईचा । प्रतिनिधी-दोडांईचा शहरातील वाढती लोकसंख्या व विस्तार बघता महाराष्ट्र शासनाने दोडांईचा येथे फिरते रूग्णालयासाठी वैशिष्टयपूर्ण योजनेंतर्गत 3 कोटींचा भरघोस निधी मंजुर केला आहे. राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

शहरातील झोपडपट्टी निर्मुलनासाठी केंद्रीय एकात्मिक घरकुल योजना राबवली पण ती शहरापासुन 2 ते 5 कि.मी.वर आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना मुलभुत सुविधा पुरवण्यास नगरपालिका कमी पडत होती.

त्यातच कुणी रूग्णाला वैद्यकीय सुविधेसाठी स्वतःच पायपीट करावी लागत होती. नगरपालिका निवडणुकीप्रसंगी भाजपाचे पॅनलप्रमुख सरकारसाहेब रावल यांनी हे वास्तव जवळून बघीतले होते.

भारतीय जनता पक्षाची सत्ता दोंडाईचा नगरपालिकेवर आली तर तुमच्या वैद्यकीय सेवेसाठी सोय करू, असे आश्वासन सरकारसाहेब रावल यांनी दिले होते.

त्यानुसार सरकारसाहेब रावल, दोंडाईचा नगरपालिकेचा आरोग्य विभाग व शहरातील एक प्रमुख सामाजिक संस्था, रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा यांच्या सहकार्याने सदर प्रस्ताव तयार करून पाठपुरावा केला.

दोंडाईचात फिरत्या दवाखान्यासाठी 3 कोटी रूपये मिळावेत म्हणून सरकारसाहेब रावल यांनी स्वतः पुढाकार घेऊन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर निधी मंजूर झाल्यामुळे रोटरी क्लबच्या वतीने सारकारसाहेब रावल यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. अविनाश धनगर, अध्यक्ष अनिस शाह, हिमांशु शाह, श्रीकांत इंदाणी, अकुंश अग्रवाल, राकेश जयस्वाल सोबतच दोंडाईचा नगरपालिकेच्या आरोग्य सभापती सौ. वैशाली व प्रविण महाजन उपस्थित होते.

संत कबीरदासनगर, शरद पवारनगर, मोहम्मदया नगर , महात्मा फुले वसाहत, रमाई नगर, सिद्धार्थ नगर, म्हाळसानगर इत्यादी ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा पुरवेल. गरज वाटल्यास पुढील उपचारासाठी पाठवण्यात येईल.

याकामी नगराध्यक्षा सौ.नयनकुवरताई रावल यांनी सांगीतले की, फिरते रूग्णालय अधिक कार्यक्षम व्हावे यासाठी दोंडाईचा नगरपालिका आरोग्य विभाग व रोटरी क्लब आँफ दोंडाईचाच्या सहकार्याने चालवू.

याकामी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेद्र फडणवीस, आरोग्यमंत्री ना.डॉ.दिपक सांवत, रोजगार हमी व पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी सहकार्य केले, अशी माहिती दोंडाईचा नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ. वैशाली प्रवीण महाजन यांनी दिली.

LEAVE A REPLY

*