नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्या !

0

शिरपूर । प्रतिनिधी-कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवाना सरसकट तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिरपूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व असंख्य शेतकरी बांधवांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतात कापूस पिकावर बोण्डअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत.

सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना त्वरित व सरसकट नुकसान भरपाई शासनाने द्यावी. शासनाने कृषी विभागाला बोण्डअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकरी बांधवांच्या तक्रारी लेखी स्वरूपात घेण्याचे आदेश दिले आहेत.

परंतु, विहित नमुन्यातील अर्जात जाचक अटी असून वरिष्ठ बीज नियंत्रकांकडून पडताळणी झाल्यावरच शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळणार आहे.

हि बाब शेतकरी बांधवांसाठी अनुकूल नाही. या जाचक अटीमुळे शेतकरी बांधव नुकसान भरपाई पासून वंचित राहू शकतात.

बोण्डअळीचा प्रादुर्भाव झाल्याने व कीटकनाशक फवारणीचा खर्च परवडत नसल्याने तसेच अत्यल्प स्वरूपात उत्पन्न मिळाल्याने आधीच असंख्य कर्जबाजारी व सर्वसामान्य शेतकरी बांधव पिके नष्ट करीत असल्याच्या दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडत आहेत.

याबाबत शासनाने सरसकट नुकसान भरपाईची त्वरित घोषणा करून कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय द्यावा, तसेच शेतकरी बांधवांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी जलद गतीने प्रयत्न व्हावेत अशा आशयाचे निवेदन आ.काशीराम पावरा व पदाधिकारी यांच्या हस्ते तहसीलदार महेश शेलार यांना देण्यात आले.

निवेदनावर आ.काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, शहराध्यक्ष नितीन गिरासे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष देवेंद्र राजपूत, जिल्हा ओबीसी अध्यक्ष शामकांत ईशी, शिरपूर मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, माजी सभापती नारायणसिंग चौधरी, सुदामसिंग राजपूत, अशोक कलाल, के.डी.पाटील, वासुदेव देवरे, दत्तू पाडवी, नामदेव चौधरी, उपसभापती ईशेंद्र कोळी, केवलसिंग चौधरी, जिल्हा परिषद सदस्य कल्पनाबाई राजपूत, अविनाश गुजर, राजकपूर मराठे, बोराडीचे राजेंद्र पाटील, जयवंत पाडवी, हिरालाल पावरा, दीपक गुजर, माजी सभापती राजेंद्र पाटील, प्रतापराव पाटील, मोहन पाटील, शांताराम मुले, सत्तरसिंग पावरा, जे. टी. पाटील, योगेश पाटील, इरमान मिर्झा, राजेंद्र चौधरी, महेश कोळी, हिम्मतसिंग राजपूत, सुनील चौधरी, महेंद्र राजपूत, अवधूत मोरे, प्रल्हाद पाटील, काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, शेतकरी बांधव यांच्या स्वाक्षरी असून सर्व मान्यवर उपस्थित होते. यानंतर सर्व मान्यवर यांनी कृषी अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

*