ई सेवा केंद्रधारकांचा बंद

0

धुळे । दि.27 । प्रतिनिधी-राज्य शासनाच्या संग्राम केंद्रांना दिलेल्या लिंकबद्दल व महसूल सेवा दिल्यामुळे ई सेवा केंद्रांनी एक दिवस बंद पाळला. युनियनतर्फे हा बंद पुकारण्यात आला होता.

सीएससीमार्फत संग्राम सेवा केंद्रांना लिंक दिल्यामुळे महाराष्ट्रातील 25 हजार महा ई-सेवा केंद्र चालकांचा व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आला आहे.

राज्यातील सर्व महा ऑनलाईन सेतू केंद्र चालकांवर होत असलेला अन्याय दूर करावा. महा ऑनलाईन सेतू केंद्राच्या सर्व सेवा सीएससी व संग्राम केंद्र यांना दिल्यामुळे सर्वांना बेरोजगार बनविण्याचा निर्णय मागे घ्यावा, सन 2008 पासून शासनाच्या सेवा लोकांना दिल्या आहेत, कधीही मानधनाची मागणी न करता निव्वळ कमिशनवर काम करीत आहोत.

संग्राम चालकांसारखे ई सेवा केंद्रांना मानधन द्यावे, केंद्रात दोन ते तीन संगणक चालक असून तेही बेरोजगार होणार आहेत. शासनाने आपला निर्णय रद्द करुन रोजगार परत द्यावा, अशी मागणी महेंद्र शिरसाठ, संजय मोरे, मंगला मोरे, गणेश चौधरी, पंकज बागूल, महेंद्र बडगुजर, अतुल देवरे, अनिल वाणी आदींनी केली.

LEAVE A REPLY

*