मराठा सेवा संघाच्या देशमुख कृषी कक्ष तालुकाध्यक्षपदी विश्वासराव देसले

0

कापडणे । दि.25 । प्रतिनिधी-येथील सेवानिवृत्त प्राचार्य व माजी ग्रा.पं.सदस्य विश्वासराव आत्माराम देसले यांची मराठा सेवा संघाच्या पंजाबराव देशमुख कृषी पक्षाच्या धुळे तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

धुळे येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कृषी कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बेंद्रे यांनी ही निवड जाहीर केली.

याप्रसंगी कापडणे विद्या प्रसारक संस्थेचे माजी प्राचार्य विश्वासराव देसले यांच्या कामाची दखल घेत ही निवड करण्यात आली.

देसले यांनी येथील ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्य तसेच ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष आदी पदे भूषविली आहेत. अनेक वर्ष ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

शेतकर्‍यांसाठी या माध्यमातून कार्य करणार असून शेतकर्‍यांचे प्रश्न सरकार दरबारी कृषी कक्षाच्या माध्यमातून मांडणार आहे.

LEAVE A REPLY

*