मेंढ्यांच्या मृत्यूबाबत कार्यवाही करा ! – ना.रावल

0

दोंडाईचा । प्रतिनिधी-धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून ठेलारी बांधवांच्या मेंढ्यांना विशिष्ट आजारामुळे मृत्यू येत आहेत, जवळपास 500 पेक्षा अधिक मेंढ्या या रोगामुळे मरण पावल्या असून ठेलारी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे, म्हणून पशुसंवर्धन विभागाने याची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी अशा सूचना राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री तथा नंदूरबार चे पालकमंत्री ना जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.

आज दि. 25 रोजी ना रावल यांना दोंडाईचा व वरझडी येथील मेंढपाळ बंधूनी भेट घेऊन याबाबत माहिती सांगितली त्यानुसार मंत्री रावल यांनी तातडीने पशुसंवर्धन अधिकाऱयांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या.

याबाबत ना रावल म्हणाले की, धुळे आणि नंदूरबार जिल्हयात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ बांधव आपला व्यवसाय करतात परंतु गेल्या 15 दिवसापासून मेंढ्यावर विशिष्ट प्रकारच्या आजारामुळे त्याना मरण येत आहे.

परिणामी मेंढपाळ बांधव यांचे प्रचंड नुकसान होत आहे, यावर छावण्या सुरू करून आजारावर उपाययोजना कराव्यात अशा सूचना मंत्री रावल यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

*