भारतीयांसमोर मानवतेचे आव्हान !

0

धुळे । दि.25 । प्रतिनिधी-भारतीयांसमोर मानवतेचे आव्हान आहे. हिंदू-मुस्लिम समाजाने या समस्येवर उपाय आखला पाहिजे. परिसराच्या स्वच्छतेबरोबरच मनाचीदेखील स्वच्छता झाली पाहिजे.

मतभेद असू शकतात, पण मनभेद असू नयेत. एकत्र आल्याशिवाय मैत्री होत नाही आणि त्याशिवाय गैरसमज दूर होत नाहीत. त्याशिवाय देशाचीही प्रगती होेणार नाही.

ही धरती प्रत्येकाची जननी आणि कर्मभूमी आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम भेद न ठेवता देशाच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे, असे प्रतिपादन जमियत उलमा हिंदचे हजरत मो.महमुद मदनी यांनी केले.

जमियत उलमा हिंदच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शहरात शुक्रवारी रात्री अमन एकता संमेलन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी इंद्रदेव महाराज, बाबा धिरजसिंग, भंते रत्नदीप, फादर विल्सन रॉडिक्स, नदीम सिद्दीकी, मुफ्ती रिजावाबुल हसन चतुर्वेदी उपस्थित होते.

मोहंमद मदनी पुढे म्हणाले, भारताची फाळणी झाली त्यावेळी मुस्लिमांना नवीन देशात जाण्याची संधी दिली होती. परंतु आपण भारतीय आहोत, हा विचार त्यावेळीही कायम राहीला.

देशाच्या गौरवासाठी हिंदू-मुस्लिम,शिख- ख्रिश्चन समाजबांधवानी एकत्र आले पाहिजे. मतभेद अवश्य ठेवावेत परंतु मनभेद होऊ नयेत, अन्यथा इतर त्याचा गैरफायदा घेतात.

प्रत्येकाने परस्परांवर प्रेम केले पाहिजे. ईश्वर-अल्लाचे स्थान ज्या हृदयात आहे, तेथे द्वेष असू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी आत्मपरिक्षण करावे.

वृक्षारोपण करून पर्यावरणावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगीतले. या वेळी इंद्रदेव महाराज, बाबा धिरजसिंग, भंते रत्नदीप आदींनी मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*