नंदुरबारात नगराध्यक्षासाठी 33 नगरसेवकपदासाठी 440 अर्ज

0

नंदुरबार । दि.24 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा व नवापूर नगरपालिकेच्या निवडणूकांसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर नगराध्यक्ष पदासाठी 33 तर नगरसेवक पदासाठी 440 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

नंदुरबारात नगराध्यक्षपदासाठी 16, नवापुरात 10 तर तळोद्यात 7 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. उद्या दि. 25 रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

नंदुरबार पालिका निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नगरसेवकांच्या 39 जागांसाठी 238 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 10 तर नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी 138 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

तळोदा पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून नगरसेवक पदाच्या 18 जागांसाठी 64 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

तिन्ही नगरपालिकांसाठी नगराध्यक्ष पदाच्या 3 जागांसाठी 33 अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदाच्या 77 जागांसाठी 440 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान उद्या दि.25 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. 30 नोव्हेेंबर पर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर तिन्ही पालिकांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*