चंदनपुरी यात्रेस जाणार्‍या भाविकांच्या वाहनाला अपघात दराणे फाट्याजवळ एक ठार : 34 जखमी

0

कापडणे । दि.24 । प्रतिनिधी-शिंदखेडा तालुक्यातील दराने फाटयाजवळ टेम्पो उलटून आज (दि.24) पहाटे झालेल्या एका अपघातात टेम्पो उलटुन एक जण ठार तर 34 जण जखमी झाले. चंदनपुरी येथील यात्रेसाठी हे भाविक जात होते.

आज (दि.24) रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास असलोद (ता. शहादा) येथील भाविक टेम्पो गाडीने चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांचा नवस फेडण्यासाठी जात होते.

दराणे फाट्याजवळ हॉटेल साईश्रद्धाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर टेम्पो (एम. एच.21, 5143) आदळला. यावेळी टेम्पातील सर्व जण जखमी झालेले आहेसदर घटना पहाटे पाच वाजेला घडली.

रस्त्याच्या कडेला एक चारा भरून ट्रॅक्टर उभे होता. यावेळी सोनगीरकडे येताना दाट धुक्यामुळे ट्रॅक्टरवर टेम्पो आदळला. यावेळी टेम्पोमधील सर्वजण दाबले गेले.

या अपघाताची माहिती हॉटेल साईश्रद्धा चे मालक रवींद्र धनगर यांनी सोनगीर ग्रामीण रुग्णालयातील 108 क्रमांक असलेल्या रुग्णवाहिकेला कळविली. रुग्णवाहिका तात्काळ अपघातस्थळी दाखल झाली.

मदतीसाठी हॉटेल मालक, कामगार उपस्थित होते. जखमींना सोनगीर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णवाहिकेने तीन ते चार फेर्‍या करून जखमींना रुग्णालयात दाखल केले

या अपघातात महिलांसह लहान मुलांचा देखील समावेश होता या अपघातात राजाराम पूना मराठे (60), कल्पना हरी मराठे (35), जिजाबाई ज्ञानेश्वर मराठे(55), सुमन शंकर मराठे (70), माधुरी गणेश मराठे (20), ज्योति हरी मराठे (19), लताबाई राजेश सूर्यवंशी (32), राजेश बाबूलाल पाटील (48), जय राजेश पाटील (9), पल्लवी राजेश पाटील (15), शोभा मछिंद्र कोळी (35), सरला गणेश मराठे (35), कुणाल हरी मराठे (10), बनाबाई खण्डु कोळी (70), रंगराव देविदासमराठे (51), आनंदा कुमा मराठे (45), युवराज विठोबा मराठे (35), शांताराम नारायण मराठे (52), ज्योती युवराज मराठे (35), मुकेश सुभाष मराठे (20), कोमल युवराज मराठे (10), अरुण ताणका सोनवणे (55), अरुण वामन मराठे (50), दीपाली सिंधात कढरे (20), बाळा भगवान पाटील (35), विजय दिलीप पाटील (29), सिद्धांत माधव पाटील (25), मालुबाई राजाराम मराठे (50), आशाबाई सुभाष मराठे(45), बुधा पुनाजी मराठे (66), खटाबाई विठोबा मराठे (65), अनिता शांताराम मराठे (39), सुमनबाई जाधव (78) हे सर्व जखमी झाले असून या अपघातात द्वारकाबाई कुमा चव्हाण (75) यांचे धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

*