धुळ्यात वादळासह पावसाची हजेरी

0
धुळे / मे हिटचा तडाखा जाणवत असतांना सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला. वादळ सुटले व शहरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली.
त्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
धुळ्याचे तापमान आज 42 अंशावर स्थिरावले होते. प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. सायंकाळनंतर मात्र वातावरणात बदल झाला.
ढगाळ वातावरण होवून वारा सुटला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसाने हजेरी लावल्याने व वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही.

पावसाळा केवळ सात दिवसांवर येवून ठेपल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीकामाला वेग दिला आहे. शेतीची मशागतही अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकर्‍यांना पावसाची प्रतिक्षा आहे.

जिल्हा प्रशासनाने कृषि दुकानांवर बियाणे व खते उपलब्ध करुन दिली आहेत. परंतू शेतकर्‍यांना अद्याप बियाणे खरेदी केलेली नाहीत.

दुसरीकडे शेतीकामांना वेग आला असून बागायती कपाशीच्या लागवडीसाठी जोमाने तयारी सुरु असल्याचे चित्र धुळे जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

*