नाशिक परिक्षेत्रातील पोलीस क्रीडा स्पर्धेत धुळ्याच्या खेळाडूंना सुवर्णपदक

0

धुळे । दि.24 । प्रतिनिधी-नाशिक परिक्षेत्रातील पोलिस क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्हा पोलिस दलातील 8 खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविले आहे.

65 किलो वजन गटात धिरज शिवाजी सांगळे, 61 किलो वजन गटात धिरज घनश्याम गवते, 86 किलो वजन गटात सखाराम दयाराम खांडेकर, ज्युडो स्पर्धेतील 66 किलो वजन गटात धिरज शिवाजी सांगळे, ज्युडो स्पर्धेतील 90 किलो वजन गटात सखाराम दयाराम खांडेकर, तिहेरी उडी स्पर्धेत नवलसिंग हावल्या वसावे, ज्युडो स्पर्धेेतील 52 किलो वजन गटात समरीन हमीद शेख, सोनाली मधुकर श्रीखंडे, भावना शांताराम पाटील अशा 10 खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळविले आहे.

तर सिल्व्हर मेडल प्रकाश शंकर थोरात, शुरसिंग धनजी पाडवी, समरीन हमीद शेख, भावना शांताराम पाटील, माधूरी अण्णा हाटकर यांना मिळाले.

ब्रांझ पदक मुकेश गणेश दुरगुडे, सुरसिंग धनजी पाडवी,मुन्नी रूत्या तडवी आहेत. चतुर्थ- रंजना रोहिदास जाधव, मोहिनी शंकर भिसे, ललिता रमेश पाटील यांना मिळाले.

सदरील खेळाडूना पोलिस अधिक्षक एम.रामकुमार, अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, रविंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रमेशसिंग परदेशी, अरमान तळवी, रविंद्र प्रकाश वनतोडे यांनी सदरील खेळाडूची तयारी करून घेतली.

LEAVE A REPLY

*