जो.रा.सिटीच्या वल्लभ जाधव यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

0

धुळे । दि.24 । प्रतिनिधी-विभागीय शालेय तायक्वोंदो स्पर्धा जळगाव येथे झाल्या. या स्पर्धेतून जो.रा.सिटी कनिष्ठ महाविद्यालयातील वल्लभ जाधव यांची 17 वर्ष वयोगटात 67 किलो वजन गटात अलिबाग येथे होणार्‍या शालेय राज्यस्तर तायक्वोंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या राज्य शालेय स्पर्धेत वल्लभ जाधवने आपल्या सर्वोत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करुन प्रथम क्रमांक पटकावला. वल्लभची 4 ते 6 डिसेंबरदरम्यान दिल्ली येथे होणार्‍या शालेय राष्ट्रीय तायक्वोंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्याला क्रीडा विभागप्रमुख राजेंद्र बारे, अमित गोराणे, भूपेंद्र मालपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. वल्लभच्या यशस्वी निवडीबद्दल धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवी बेलपाठक, सचिव संतोष अग्रवाल, प्राचार्या सौ.आर.आर.पेटारे, उपमुख्याध्यापक बी.के.नेरकर, उपप्राचार्य एन.टी.ठाकरे, पर्यवेक्षक एम.जी.भट, एम.एम.रेंभोटकर आदींनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*