हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

0

धुळे । दि.23 । प्रतिनिधी-शहरातील देवपूर परिसरातील वाडीभोकर रोडवरील सैलानी कॉलनीत हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला करुन गंभीर जखमी केले.

जखमी तरुणाला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील देवपूर परिसरात असलेल्या वाडीभोकर रोडवरील सैलानी कॉलनीत रवींद्र गोपाल कोरे (वय30 रा.ऊसगल्ली धुळे) हा हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेला असतांना तेथे रवींद्रशी बबलू महाले, बच्चू महाले, बंटी माळीसह सात ते आठ जणांनी वाद घातला. या वादानंतर रवींद्रला फायटर व लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केला. यात रवींद्र हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पप्पू विभुते यांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

रवींद्रवर हल्ला का केला याचे कारण समजू शकले नाही. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत देवपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

*